पोलीस ॲक्शन मोडमध्ये; सण-उत्सवांसाठी पोलिसांची 'अशी' आहे तयारी; पाहा मार्गदर्शक सूचना

Maharashtra Police Guidelines: पोलीस खात्याकडून स्थानिक पोलिसांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केली गेली आहे.
पोलीस ॲक्शन मोडमध्ये; सण-उत्सवांसाठी पोलिसांची 'अशी' आहे तयारी; पाहा मार्गदर्शक सूचना
Maharashtra police In action mode; Police guidelines for festivalsSaam Tv

मुंबई: देशात रमजान ईद आणि अक्षय्य तृतीया हे दोन्ही सण उत्साहात साजरे करण्यात येत आहे. अशात समाजकंटकांकडून धार्मिक तेढ निर्माण केला जाऊ शकतो. या घटनांना रोखण्यासाठी पोलीस (Maharashtra Police) खात्याकडून स्थानिक पोलिसांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना (Guidelines) केली गेली आहे. यासाठी स्थानिक पोलिसांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. (Maharashtra police In action mode; Police guidelines for festivals)

हे देखील पाहा -

१) सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश, चित्र, चित्रफिती याबाबत समाज अतिशय संवेदनशील असून, त्यांच्याकडून याबाबींचा निषेध करण्यासाठी आक्रमक आणि हिसंक पवित्रा घेण्यात येतो. यावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना यापुर्वी महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. तरी रमजान ईद दरम्यान सोशल मीडियावरुन असे संदेश प्रसरीत होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी व असे संदेश प्रसारीत झाल्यास, त्याची तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी.

२) रमजान ईदच्या कालावधीत गोहत्या, गोवंश अथवा गोमांस वाहतूक, हिंदुत्ववादी संघटनेच्या नजरेस आल्यास, त्याच्या तीव्र प्रतिक्रीया या महाराष्ट्रात उमटू शकतात. तरी अवैधरित्या होणारी प्राणी वाहतूक, बेकायदेशीर गोहत्या, गोमांस बाळगणे तसेच वाहतूक याबाबच्या घटना घडल्यास, त्यातून जातीय तणाव निर्माण होणार नाही. यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

३) यापूर्वी रमजान महिन्यामध्ये शुभेच्छा फलक लावण्यावरुन राज्यात गुन्हे दाखल आहेत. राजकीय पक्षांकडून आपआपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी शुभेच्छा फलकांची वाढ रमजानच्या कालावधीतही होण्याची शक्यता आहे. तरी यावर्षी लावण्यात येणाऱ्या शुभेच्छा फलकावरुन आक्षेपार्ह मजकूर नसल्याची खात्री करावी. तसेच विविध मुस्लिम व राजकीय पक्ष किंवा संघटनेकडून विनापरवाना आणि प्रक्षोभक मजकूर असलेले शुभेच्छा फलक लावण्यावरुन जाणीय तणाव निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

४) रमजान ईद दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास मुस्लिम समाज व संघटनांतर्फे आंदोलनात्मक कार्यक्रम किंवा इतर प्रतिक्रिया उमटू शकतात. याबाबत संबधित विभागांशी समन्वय साधून योग्य ती दक्षता घेणे उचित होईल.

५) न्यायालयीन आदेशानुसार ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर घातलेल्या निर्बंधावरुन हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लीम समाज संघटनांकडून एकमेकांविरुध्द आरोप-प्रत्यारोप करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता नाकाराता येत नाही. याकरीता योग्य ती दक्षता घ्यावी.

६) रमजान ईद नंतर बासी व तीवसी ईद दरम्यान मुस्लिम महिला, तरुण वर्ग हे चित्रपटगृह, उद्यान किंवा प्रेक्षणीय स्थळावर जातात. अशा ठिकाणी महिला व मुलींच्या छेडछाडीची घटना घडून त्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याकरीता योग्य ती दक्षता घ्यावी.

७) सर्व धार्मिक स्थळे, मशिदी, रमजानची नमाज अदा करण्याच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन, घातपात होणार नाही तसेच निषिध्द प्राण्यांचा शिरकाव होणार नाही, याकीरता उपाय योजना कराव्यात. परिस्थितीनुरुप गुप्तचर यंत्रणा कार्यान्वित करुन, कट्टरपंथीय जातीयवादी कार्यकर्त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे तसेच सर्व कार्यक्रमांचे आयोजक, शांतता समितीची सदस्य, राजकीय नेते, समाजसेवक यांचेशी संपर्क ठेवून त्यांच्या बैठका घेऊन, सर्व जाती-धर्मांमध्ये सामाजिक सलोखा व सद्भावनेचे वातावरण राहील, याची दक्षता घ्यावी. तसेच नजिकच्या कालावधीत ज्या ठिकाणी जातीय तणावाच्या घटना घडल्या आहेत, त्या ठिकाणी विशेष लक्ष दयावे.

८) कोरोना आणि ओमक्रॉन रोगास प्रतिंबध करण्यासाठी केंद्र व राज्यशासनातर्फे निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशाच्या अनुषंगाने रमजान ईदच्या वेळीस योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

९) एखाद्या जातीय घटनेचे तात्काळ रुपांतर दंगली मध्ये होत असल्याने प्रसंगानूसार सदर कालावधी एखादी शुल्लक जातीय घटना घडल्यास, वेळीच वरिष्ठ पातळीवर त्याची दखल घेऊन, परिणामकारक कायदेशीर कारवाई करावी.

Maharashtra police In action mode; Police guidelines for festivals
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 345 जणांना नोटीस

१०) आपल्या हद्दीत गुड मॉर्निंग स्कॉड कार्यान्वित करुन त्यावर परिणामकारक पर्यवेक्षण करावे.

११) दंगल विरोधी कवायती घेऊन कोणत्याही दंगलसदृष्य परिस्थिती हाताळण्यास दंगल विरोधी पथकास सुसज्ज राहण्याबाबत सूचना द्याव्यात.

१२) गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करावी.

१३) अवैध धंदे चालणाऱ्या ठिकाणी धाडी आयोजित करण्यात याव्यात.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.