Police Recruitment : पोलीस भरतीचं नियोजन पूर्ण; येत्या १२ डिसेंबरपासून होणार मैदानी चाचणी!

पोलीस भरतीचं नियोजन पूर्ण झालं असून लवकरच मैदानी चाचणी होईल अशी माहिती राज्याच्या गृहविभागाकडून देण्यात आली आहे.
Police recruitment
Police recruitmentsaam Tv

मुंबई : पोलीस भरतीसंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. पोलीस भरतीचं नियोजन पूर्ण झालं असून लवकरच मैदानी चाचणी होईल अशी माहिती राज्याच्या गृहविभागाकडून देण्यात आली आहे. पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) अर्ज करण्याची शेवटची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. कागदपत्रांची पडताळणी होउन अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी सात दिवसांच्या मुदतीत कॉल लेटर पाठविले जाणार आहे.

Police recruitment
Electricity Bill : सर्वसामान्यांना मोठा झटका; लाईट बिल तब्बल २०० रुपयांनी महागणार

गृहविभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १२ डिसेंबरपासून पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू होणार आहे. याशिवाय मैदानी चाचणीच्या निकालानंतर लेखी परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया रडखडलेली होती. तीन वर्षांपासून पोलीस भरती होणार अशा अनेक घोषणा झाल्या. पण भरती प्रक्रिया काही सुरू झालेली नव्हती.  (Latest Marathi News)

दरम्यान, राज्यात शिंदे-भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी तातडीने रडखडलेल्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा केला. त्यानुसार, राज्याच्या गृह विभागाकडून पोलीस शिपाई आणि चालक पदाच्या १७ हजार १३० जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. आतापर्यंत जवळपास दोन ते अडीच लाख उमेदवारांनी अर्ज केल्याचा अंदाज आहे.

Police recruitment
Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; कुटुंबीयांनी दिलं स्पष्टीकरण

उमेदवारांनी आरक्षणनिहाय जागांचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरले आहेत. दुसरीकडे मैदानी व लेखी परीक्षेची जय्यत तयारीसुध्दा सुरू केली आहे. मैदानी चाचणी ५० गुणांची तर लेखी परीक्षा १०० गुणांची असणार आहे. प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण बंधनकारक आहेत.

पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरूणांना मोठा फायदा होणार आहे. परंतु, लेखी परीक्षेसाठी त्यांना चांगलेच कष्ट करावे लागणार आहे. भरतीसाठी राज्यभरातून चार लाखांपर्यंत अर्ज येतील, असा अंदाज आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com