मोठी बातमी! महाराष्ट्रात लवकरच पोलीस भरती, ७ हजार पदे भरणार

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
मोठी बातमी! महाराष्ट्रात लवकरच पोलीस भरती, ७ हजार पदे भरणार
Maharashtra Police RecruitmentSAAM TV

भूषण शिंदे

मुंबई: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात लवकरच ७ हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती मिळते. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यात ७ हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. (Maharashtra Police Recruitment)

Maharashtra Police Recruitment
Police Recruitment: पोलीस दलातील 5297 रिक्त पदांची भरती सुरु; गृहमंत्र्यांची माहिती

गडचिरोलीत ४०० हून अधिक पदे

गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील ४१६ पदे तातडीने भरण्यास गृह विभागाकडून (Home Minister) मान्यता देण्यात आली होती. गृहखात्याकडून तसे आदेश देण्यात आले होते. याबाबत मार्चमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलीस अधीक्षकांना ही रिक्त पदे भरण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.

काही वर्षांपासून जिल्ह्यातील पोलीस विभागातील अनेक पदे रिक्त होती. मात्र, भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही. पालकमंत्री शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी या जिल्ह्याचा दौरा केला. पोलीस दलात सहभागी होण्याची इच्छा अनेक युवकांची असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यांनी तातडीने यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर गृहविभागाकडून भरती प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार दीडशे पोलीस शिपाई, १६१ पोलीस शिपाई चालक आणि १०५ सशस्त्र पोलिसांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com