Video : महाराष्ट्राची राजकीय कुंडली काय सांगते? नेत्यांच्या पत्रिकेत कोणता योग? ज्योतिषी म्हणाले...

Maharashtra Political Astrology : पंडित शिवकुमार श्री ज्योतिर्विद, पंडित राजकुमार शर्मा, सिद्धेश्वर मारटकर आणि रमनलाल शहा या राजकीय ज्योतिषींनी (Political Astrologer) महाराष्ट्राच्या राजकीय कुंडलीबाबत आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत अनेक दावे करण्यात आले आहे.
Video : महाराष्ट्राची राजकीय कुंडली काय सांगते? नेत्यांच्या पत्रिकेत कोणता योग? ज्योतिषी म्हणाले...
Maharashtra Political AstrologySaam Tv

मुंबई: शिवसनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारपासून नॉट रिचेबल होते. त्यांनतर ते सूरतमधील एका हॉटेलात असल्याची माहिती मिळाली. इतकेच नाही तर, एकनाथ शिंदेंच्या समर्थनात शिवसेनेचे ३० ते ३५ आमदार असल्याच्या चर्चा आहेत. यातच एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक प्रस्ताव पाठवला. यात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्यात यावं आणि भाजपसोबत पुन्हा युती करण्यात यावी, अशी मागणी केली गेली. एकनाथ शिंदेंची ही मागणी शिवसेनेने मात्र फेटाळली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेल्या या धुरळ्याकडे आणि राजकीय परिस्थितीकडे ज्योतिषशास्त्राच्या (Astrology) नजरेतून पाहिल्यास महाराष्ट्राची राजकीय कुंडली काय सांगते? तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे याच्यातील नात्याबद्दल ज्योतिषशास्त्रानुसार काय तर्क लावता येईल, याबात घेतलेला हा आढावा. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

पंडित शिवकुमार श्री ज्योतिर्विद, पंडित राजकुमार शर्मा, सिद्धेश्वर मारटकर आणि रमनलाल शहा या राजकीय ज्योतिषींनी (Political Astrologer) महाराष्ट्राच्या राजकीय कुंडलीबाबत आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत अनेक दावे करण्यात आले आहे. याबाबत पंडित शिवकुमार श्री ज्योतिर्विद म्हणाले की, 'मी ८ दिवसांपूर्वीच दावा केला होता की, येत्या १५ दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार आहे. तसेच पंडित राजकुमार शर्मा याबदद्ल म्हणाले की, महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. आता तुळ राशी आहे, आता केतुची महादशा सुरु आहे. ११-०९-२०१९ पासून ११-०९-२०२६ पर्यंत महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊ शकतं. १२ जुलै अगोदर सत्ता परिवर्तन होऊ शकतं. कुणी मोठा नेता मविआला सोडू शकतो किंवा स्वतःचा पक्ष काढू शकतो. उद्धव ठाकरेंच्या कुंडलीनुसार, २७ जुलै १९६० यानुसार त्यांच्या राशीनुसार त्यांच्यावर शनीची दशा सुरू झाली आहे. आता शनी हा २८ एप्रिलपासून कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ३ ते ४ दिवसांत त्यांच्या खुर्चीला धोका निर्माण होऊ शकतो, असा खळबळजनक दावा ज्योतिषींनी केला आहे.

सिद्धेश्वर मारटकर या राजकीय ज्योतिषींनी महाराष्ट्राच्या राजकीय कुंडलीबाबत सांगितलं की, महाराष्ट्राची रास धनू मानली जाते. १४ जून ते २९ जून या काळात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेनुसार त्यांचं कन्या लग्न आहे आणि सिंह रास आहे. त्यामुळे जून महिना उद्धव ठाकरेंसाठी प्रतिकूल ग्रहस्थिती दाखवण्यात येते आहे, असा दावाही त्यांनी केला. त्याचप्रमाणे शरद पवारांनाही हा महिना प्रतिकूल असल्याचा दावा ज्योतिषींनी केली.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची कुंडली स्ट्रॉंग असल्याचं पंडित शिवकुमार श्री ज्योतिर्विद यांनी सांगितलं. २६ जूनला येणारा मंगळ यांच्यासाठी अनुकूल असल्याचे त्यांनी सागितलंय. तसंच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होऊ शकतील असंही ज्योतिषी सांगतात. तसेच अशा परिस्थितीत मुंबईवर ताण येऊ शकतो, असा दावाही ज्योतिषींनी केला आहे.

Maharashtra Political Astrology
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राजकीय भूकंप, काँग्रेसमध्ये 'सौम्य धक्के'

राजकीय ज्योतिषी रमनलाल शहा यांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरेंनी यांची पत्रिका बिघडलेली आहे, तर आदित्य ठाकरेंना साडेसाती आहे. त्यामानाने फडणवीसांची पत्रिका बरी आहे. आजची रात्र तरी काही निर्णय येणार नाही. मविआसाठी आजची आणि उद्याची रात्र त्रासदायक आहे, असा दावाही ज्योतिषींनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com