शिंदेंच्या नाराजीनाट्यात बिचुकलेंची उडी; आता बाळासाहेब असते तर कानाखाली जाळ काढला असता

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यामध्ये बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी उडी घेतली आहे. अभिजीत बिचुकले यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
शिंदेंच्या नाराजीनाट्यात बिचुकलेंची उडी; आता बाळासाहेब असते तर कानाखाली जाळ काढला असता
abhijit bichukale and Eknath shinde Saam Tv

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत दहाव्या जागेसाठी भाजपने (BJP) महाविकास आघाडीवर मात केली आहे. या निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा चालला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे मते फुटल्याची उघडकीस आले आहे. विधानपरिषदेच्या निकालानंतर शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे या नॉट रिचेबल झाले आहेत. सध्या २५ आमदारांसहित शिंदे गुजरातमधील एका हॉटेलमध्ये असल्याचे समजते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाराजीनाट्यामध्ये बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit bichukale) यांनी उडी घेतली आहे. अभिजीत बिचुकले यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ( Maharashtra Political Crisis News In Marathi )

 abhijit bichukale and Eknath shinde
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं ते भाकित खरं ठरणार? चर्चांना उधाण

शिवसेना नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्यानंतर सकाळपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार का, या चर्चांना देखील राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. एकनाथ शिंदे गुजरातमधील सुरतमध्ये गेल्यानंतर राज्याच्या राजकारणाबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. याचदरम्यान, बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर भाष्य केलं आहे. 'एकनाथ शिंदे सारखे लोक उद्धव ठाकरेंना अडचणीत आणत आहेत. आता बाळासाहेब असते तर बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेच्या कानाखाली जाळ काढला असता' असा खणखणीत टोला अभिजीत बिचुकले यांनी शिंदे यांना लगावला आहे.

 abhijit bichukale and Eknath shinde
आम्ही सत्तेसाठी कधीही…”; एकनाथ शिंदेंचं बंडानंतर पहिलं ट्विट

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सावरेपर्यंत शिंदेंनी दूसरा धक्का दिल्याची चर्चा आहे.आता एकनाथ शिंदे यांनी पहिलीच प्रतिक्रिया ट्विट करुन दिली आहे. 'आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही' अस ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. (Political crisis in Maharashtra)

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण (maharashtra politics) आज (मंगळवार) सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde latest updates) हे सेनेच्या (shivsena) सुमारे 17 आमदारांसह सूरतला (Eknath Shinde in Surat) गेल्याचे समजते. दरम्यान महाविकास आघाडी सरकार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सावरेपर्यंत शिंदेंनी दूसरा धक्का दिल्याची चर्चा आहे. शिंदे हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील (Gujarat BJP chief C R Patil) यांच्याशी संपर्कात हाेते असेही समजते.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com