Maharashtra Crisis : आठ अपक्ष आमदारांनी बहुमत चाचणी घेण्यासाठी केला राज्यपालांना मेल

आठ अपक्ष आमदारांनी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणी घेण्यासाठी मेल करण्यात आला आहे, अशी माहिती 'एनआयए' संस्थेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
Bhagatsingh koshyari
Bhagatsingh koshyari saam Ttv

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर हे राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात सत्तास्थापनेसाठी भाजप आग्रही असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. यावेळी भाजपकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणीसाठी पत्र दिलं आहे. दुसरीकडे आठ अपक्ष आमदारांनी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणी घेण्यासाठी मेल करण्यात आला आहे, अशी माहिती 'एनआयए' संस्थेच्या सूत्रांकडून मिळाली आहे. ( Maharashtra Political Crisis News In Marathi )

आज दिवसभर देवेंद्र फडणवीस दिल्लीत होते. मुंबईत आल्यावर थेट राजभवनावर गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज्यभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणी करण्यासाठी बद्दलचे पत्र भाजपकडून देण्यात आलं आहे. त्यानंतर आता आठ अपक्ष आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणी घेण्यासाठी पत्र मेलद्वारे दिले आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांनी मेल केल्यानंतर राज्यपालांकडून अधिकृत काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Bhagatsingh koshyari
मोठी बातमी! देवेंद्र फणडवीस राज्यपालांच्या भेटीला; बहुमत चाचणीची केली मागणी

दरम्यान, एकीकडे भाजपने आता बहूमताची चाचणीची मागणी केली आहे. तर आजच शिवसेनेकडून (Shivsena) बहुमत चाचण्यांसारख्या मागण्या जर विरोधकांकडून करण्यात आल्या, तर आपण कोर्टात जाणार असल्याचं शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपच्या या मागणीवर राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.तर दुसरीकडे भाजपच्या बहुमत चाचणीच्या मागणीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया काय येतात हे पाहावे लागणार आहे .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com