Eknath Shinde LIVE: रक्ताचं पाणी करून शिवसेना पुन्हा वाढवू : उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदे गटाकडे ५० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. राज्यात सत्तास्थापनेच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.
Eknath Shinde LIVE: रक्ताचं पाणी करून शिवसेना पुन्हा वाढवू : उद्धव ठाकरे
Maharashtra Political Crisis Eknath ShindeSaam TV

रक्ताचं पाणी करून शिवसेना पुन्हा वाढवू : उद्धव ठाकरे

Summary

उद्धव ठाकरे एकटे राहिले पाहिजेत असा भाजपचा डाव आहे. तुम्ही निवडून आलेल्याना घेऊन जाऊ शकता, फोडू शकता पण ज्यांनी निवडून दिलं त्या शिवसैनिकांना फोडू शकत नाही. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. तुम्ही केलं तर चांगलं आणि आम्ही केलं तर शेण खाल्लं. रक्ताचं पाणी करून शिवसेना पुन्हा वाढवू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना संबोधताना सांगितलं.

हा लढा मोठा असला तरी आपण जिंकणारच, आदित्य ठाकरे यांना विश्वास

Summary

जे आपल्या सोबत नाहीत, ते आपले विरोधक आहेत. प्रत्येक लढाई आपल्याला जिंकण्यासाठी करायची आहे. जे शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत, ते खरे शिवसैनिक आहेत. जे सोडून गेले त्यांनी आपल्या भविष्याचा विचार करावा. इथून पुढे आपल्याला लढायचं आहे,असं आदित्य ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून नगरसेवकांना मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लागले कामाला; थोड्याच वेळात नगरसेवकांसोबत संवाद साधणार

Summary

शिवसेना भवनावर मुंबईतील नगरसेवक येण्यास सुरूवात झाली आहे. मातोश्रीवरील खासदारांची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ऑनलाईनद्वारे नगरसेवकांच्या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्रीवर खलबतं; महाविकास आघाडीचं पुढं काय होणार ?

Summary

एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्रीवर महत्वाची बैठक झाली. महाविकास आघाडीबाबत प्रमुख नेते काय निर्णय घेतात,याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बंडखोरांबाबात मोठा निर्णय होण्याची शक्यता, शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या महत्वाची बैठक

Summary

बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटात आणि शिवसेनेत संघर्ष वाढत चालला असून महाराष्ट्राच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळेच शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून उद्या शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत बंडखोरांबाबात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील मातोश्रीवर पोहोचले

शिवसैनिक आक्रमक, शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाबाहेरील फलकाची तोडफोड

हे नाट्य नवे नाही, एका वर्षापासून कुरबुर सुरूच होती- आदित्य ठाकरे

विधानसभा उपाध्यक्ष विधानभवनात पोहोचले

सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ हे विधानभवनात पोहोचले आहेत. शिवसेनेचे शिष्टमंडळही पोहोचले असून, झिरवाळ यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे पुन्हा हॉटेलमध्ये परतले, दिल्लीकडे रवाना झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्हीसीद्वीरे संबोधन 

ज्यावेळी शिवसेना स्थापनेचा नारळ फुटला होता, तीच परिस्थिती आता आहे असे समजा. तुमच्यात जिद्द असेल तर सोबत राहा. मी तुम्हालाही सांगतो, तुमचं भविष्य उज्ज्वल वाटत असेल तर, जरूर तिकडे जा. प्रत्येकाला स्वतःच्या भविष्याचा विचार करण्याचा अधिकार आहे. मी कुणाच्याही आड येऊ इच्छित नाही. मी पात्र नसेल तर सांगा, हे पद आता सोडायला तयार आहे, असा पुनरुच्चारही ठाकरे यांनी केला.

कोणत्या पक्षात आधी विलीन होणार आहात ते ठरवा, मग बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणार हे बोला - नीलम गोऱ्हे

"कोणत्या पक्षात आधी विलीन होणार आहात ते ठरवा , मग बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणार हे बोला", नीलम गोऱ्हे यांचं पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बाबत वक्तव्य

आमदार दिलीप लांडगे गुवाहाटीतील हॉटेल रेडिसनमध्ये पोहोचले

गुवाहाटीच्या रेडिसन हॉटेलपासून काही अंतरावर काँग्रेसचे आंदोलन

शिवसेनेत अंतर्गत कलह नाही, काही जणांनी बंड केलाय - किशोरी पेडणेकर

आदित्य ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले, शिवसैनिकांचीही झाली गर्दी

नारायण राणेंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, नागपुरात आंदोलन

नागपुरातील व्हेरायटी चौकात नारायण राणेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल राणेंनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

एकनाथ शिंदे हॉटेल रेडिसनबाहेर पडले, एअरपोर्टकडे जाणाऱ्या मार्गाने निघाल्याची माहिती 

एकनाथ शिंदे हे नुकतेच गुवाहाटीमधील रेडिसन हॉटेलबाहेर पडले आहेत. ते सध्या एकटेच आहेत. विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने ते निघाल्याचे सांगण्यात येत आहे. तर सर्व आमदार हे हॉटेलमध्येच थांबले आहेत.

शिवसेनेकडून आणखी पाच आमदारांच्या निलंबनाची मागणी करणारी याचिका 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे बोलावली बैठक, जिल्हाप्रमुख बैठकीसाठी पोहचण्यास सुरुवात

शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी, तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांना मान्यता

विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी अजय चौधरी, तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांना मान्यता दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी गटनेते पदावर दावा केला होता. पण नियमानुसार चौधरी यांची विधीमंडळात नोंद केल्याची माहिती समजते. आता एकनाथ शिंदे काय करणार याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेनेकडून आणखी चार आमदारांच्या निलंबनाची याचिका उपाध्यक्षांकडे दाखल

एकनाथ शिंदे गटातील हे चार आमदार कोण? अशी चर्चा असून, या चार आमदारांनाही सुनावणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. आतापर्यंत शिवसेनेने एकूण १६ आमदारांच्या निलंबनाची याचिका दाखल केली आहे.

राजेश क्षीरसागर पोहचले गुवाहाटीत, शिंदेंसोबत चर्चा करतानाचा फोटो व्हायरल

सध्याच्या नियमानुसार अजय चौधरी गटनेता, तर सुनील प्रभू मुख्य प्रतोद, सूत्रांची माहिती

सध्याच्या नियमानुसार अजय चौधरी गटनेता, तर सुनील प्रभू मुख्य प्रतोद असतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे शिवसेनेच्या अर्जानुसार १२ आमदारांना नोटिसा दिल्या जाऊ शकतात. त्यांना त्यांची बाजू मांडायची संधी दिली जाईल. पक्षाच्या प्रमुखाच्या आदेशानेच गटनेता दिला जातो हे आधीच विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी स्पष्ट केलं आहे.

संजय राऊत घेणार शरद पवार यांची भेट

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. वाय. बी. चव्हाण येथे ही भेट घेतली जाणार आहे.

महाविकास आघाडी एकत्र; शिंदे गटाकडील आकडा फक्त कागदावर

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदे गटाकडील आकडा फक्त कागदावर असून आता ही लढाई कायदेशीर लढाई आहे. बंडखोर आमदार जेव्हा मुंबईत येतील तेव्हा त्यांच्या निष्ठेची कसोटी असणार आहे असंही राऊत म्हणाले आहेत.

९ वाजता गुवाहाटीतील हॉटेलमध्ये शिंदे गटाची महत्वपुर्ण बैठक

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आज सकाळी ९ वाजता हॉटेल रेडिसन एक महत्वाची बैठक होणार असून या बैटकीद्वारे ते पुढील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहित मिळत आहे.

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड होणार'

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shince) यांची निवड होणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com