विदेशातही गाजले एकनाथ शिंदे! गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर

विदेशात एकनाथ शिंदे नेमके आहेत तरी कोण याची उत्सुकता
विदेशातही गाजले एकनाथ शिंदे! गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर
Eknath Shinde Latest NewsSaam TV

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे सध्या महाराष्ट्रसह देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सेनेचे चाळीसपेक्षा जास्त आमदार सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. सध्या ते गुवाहाटीत आहेत आणि लवकरच महाविकास आघाडीला झटका देण्याच्या तयारीत असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यातच आता पाकिस्तानमध्येही एकनाथ शिंदे यांची जोरदार चर्चा सुरु आहे.

महाराष्ट्राच्या राजकाराणाला हदरवून सोडणारे एकनाथ शिंदे नेमके आहेत तरी कोण याची उत्सुकता पाकिस्तानच्या (Pakistan) नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानी नागरिक एकनाथ शिंदेंबाबत गुगलवरुन माहिती शोधात आहे. एकनाथ शिंदेंविषयी पाकिस्तामध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी माहिती सर्च केली आहे.

हे देखील पाहा -

त्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना मागे टाकत एकनाथ शिंदे गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये सर्व्यात टॉपवर आले आहेत. इतकेच नाही तर सौदी अरेबिया, मलेशिया, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, जपान आणि कॅनडातही एकनाथ शिंदे नेमके कोण आहेत याबाबद माहिती सर्च करत आहेत.

Eknath Shinde Latest News
India Corona Update: कोरोनाचा धोका कायम! सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ

शिंदेंविषयी माहिती सर्च करणाऱ्यांमध्ये 54 टक्के पाकिस्तानमध्ये,42 टक्के बांगलादेश, 54 थायलंडटक्के, सौदी अरेबियात 57 टक्के, 51 टक्के नेपाळ, 61 टक्के मलेशिया, 59 टक्के जपान आणि कॅनडामध्ये 55 टक्के लोकांनी सर्च केले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांची जात कोणती आहे? याबाबत भारतात सर्च केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे त्यामुळे पुढे नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com