राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर; सरपंच थेट जनतेतून

संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १९ सप्टेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार.
GramPanchayat Elections
GramPanchayat ElectionsSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई: पावसाचे प्रमाण कमी असले त्या ठिकाणी निवडणुका घेण्यात येणार, असं राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) मागेच सांगितलं होत त्यानुसार आता राज्यभरातील विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. (GramPanchayat Elections)

त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १९ सप्टेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली आहे.

मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ५१ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

पाहा व्हिडीओ -

त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्‌भवल्यास त्याबाबत राज्य विवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. नामनिर्देशनपत्रे २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येणार असून शासकीय सुट्टीमुळे २७, २८ व ३१ ऑगस्ट २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.

नामनिर्देशनपत्रांची छाननी २ सप्टेंबरला होणार आहे तर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे.

मतदान १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार असून मतमोजणी १९ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती मदान यांनी दिली.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे -

GramPanchayat Elections
ShivSena Bhavan Dadar: शिंदे गटाकडून थेट मातोश्रीला आव्हान; दादरमध्ये उभारणार प्रति शिवसेना भवन

नंदुरबार: शहादा- ७४ व नंदुरबार- ७५.

धुळे: शिरपूर- ३३. जळगाव: चोपडा- ११ व यावल- २.

बुलढाणा: जळगाव (जामोद)- १, संग्रामपूर- १, नांदुरा- १, चिखली- ३ व लोणार- २.

अकोला: अकोट- ७ व बाळापूर- १. वाशीम: कारंजा- ४.

अमरावती: धारणी- १, तिवसा- ४, अमरावती- १ व चांदुर रेल्वे- १.

यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरगाव- ११ व झरी जामणी- ८. नांदेड: माहूर- २४, किनवट- ४७, अर्धापूर- १, मुदखेड- ३, नायगाव (खैरगाव)- ४, लोहा- ५, कंधार- ४, मुखेड- ५ व देगलूर- १.

हिंगोली: (औंढा नागनाथ)- ६.

परभणी: जिंतूर- १ व पालम- ४. नाशिक: कळवण- २२, दिंडोरी- ५० व नाशिक- १७.

पुणे: जुन्नर- ३८, आंबेगाव- १८, खेड- ५ व भोर- २.

अहमदनगर: अकोले- ४५.

लातूर: अहमदपूर- १.

सातारा: वाई- १ व सातारा- ८. व

कोल्हापूर: कागल- १.

एकूण: ६०८

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com