VIDEO : भाजप-शिंदे गटामध्ये वादाची ठिणगी! मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच कार्यकर्ते भिडले, CCTV फुटेज समोर

भाजप आणि शिवसेनेचा ठाण्यातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
Eknath Shinde Group vs BJP Thane Clash
Eknath Shinde Group vs BJP Thane ClashSaam TV

ठाणे : राज्यात बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप मांडीला मांडी लावून सत्ता चालवत असताना आता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिंदे गटाच्या काही माजी नगरसेवकांच्या जमावाने भाजपच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप ठाण्यातील भाजप कडून करण्यात आला आहे. तसे ट्विट भाजप कडून करण्यात आले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेचा ठाण्यातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde Group vs BJP Thane Clash
Eknath Shinde: मैं खामोश हुं, क्योंकी सब जानता हूं! विधानसभेत CM शिंदेंची जोरदार बॅटिंग, उद्धव ठाकरेंवर केली सडकून टिका

ठाण्यातील शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांच्या जमावाने भाजप ठाणे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करत ट्विटरवर पोस्ट केली आहे. अशा प्रकारच्या घटना आमच्यासोबत खूप वेळा घडला आहे त्याबाबत आम्ही पोलीस ठाण्यात देखील धाव घेतली आहे.

या शिंदे गटाचे स्थानिक माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांनी या आधी देखील अशाच प्रकारे गुंडांच्या मदतीने हत्यार घेऊन आमच्या घरावर हल्ला केला असल्याचा घणाघाती आरोप देखील यावेळी भाजप पदाधिकारी प्रशांत जाधव यांचे भाऊ संदीप जाधव यांनी केला आहे.

आमच्या सोबत घडलेली घटना हि तिसरी घटना आहे. या हल्ल्यात प्रशांत जाधव यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या डोक्याला ९ टाके पडले आहेत आणि आता सिव्हिल रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या पक्षातील अंतर्गत झालेला वाद हा बॅनर लावण्याच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

त्यामुळे अशा प्रकारे दहशत पसरवणाऱ्या तेथील स्थानिक माजी नगरसेवकांवर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होत नसल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संदीप जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार संजय केळकर आणि भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com