Sanjay Raut News: त्यांच्या वाटेला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही...; राज ठाकरेंच्या गर्जनेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Sanjay Raut's Reaction to Raj Thackeray: शेवटी महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला त्यांचा धर्म दाखवावा लागेल, असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे.
Sanjay Raut
Sanjay Rautsaam tv

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त काल (९ मार्च) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला यासह अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेवर देखील भाष्य केलं. यावर आता संजय राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे. (Political News)

'कुणी कुणाच्या वाटेला गेलं नाही. त्यांच्या वाटेला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आणि मुख्यमंत्रीपद का गेलं हे अख्या जगाला माहित आहे. त्यांना जर माहीत नसेल तर त्यांच्या पक्षाची अजून व्यवस्थित वाढ होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात आमचं सरकार हे फक्त ईडी सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं. तसेच जोडीला खोके देखील होते. इडीचा अनुभव हा त्यांनी चांगल्या प्रकारे घेतला आहे, असं टीकास्त्र संजय राऊतांनी राज ठाकरेंवर सोडलं आहे.

Sanjay Raut
Political News : भाजपला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

तर बारा कोटी जनतेला त्यांचा धर्म दाखवावा लागेल

खत खरेदी सरकारने जातीचा कॉलम तयार केला आहे.'महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारनं आणि केंद्रातल्या सरकारने जात आणि धर्मावर राजकारण सुरू केलंय. महाराष्ट्राची ही परंपरा नाही महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी तुम्ही जात दाखवाल, अशा प्रकारचा जात दाखवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असेल तर शेवटी महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला त्यांचा धर्म दाखवावा लागेल, असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे.

Sanjay Raut
Maharashtra Politics : संजय राऊत पूर्ण वेडा झालेला माणूस; गोपीचंद पडळकर यांची टीका

कदाचित हे त्यांचं शेवटचं बजेट असेल...

काल अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर विरोधकांनी मोठी टीका केली. संजय राऊतांनी देखील यावरून सत्तधाऱ्याना लक्ष केलं आहे. 'सरकार कोसळण्याच्या भीतीने हे बजेट सादर केलं आहे. कदाचित हे त्यांचं शेवटचं बजेट असेल.ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे आम्हाला सर्वांना खात्री आहे की घटनेनुसार काम झालं निर्णय लागला तर सुरुवातीचे १६ आमदार अपात्र ठरतील आणि त्यानंतर हे सरकार कोसळेल अशी परिस्थिती आहे. हे सरकार कोसळलं तर लोकांमध्ये जाण्यासाठी काही भूमिका हव्यात म्हणून हे बजेट सादर केलं, असं संजय राऊत म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com