
Ajit Pawar Latest News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (११ सप्टेंबर) देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या ऊर्जा खात्याची महत्वाची बैठक घेतली. त्यामुळे अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)
या बैठकीवरून पुन्हा एकदा महायुती सरकारमधील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील खात्यातील हस्तक्षेप केल्यानंतर आता अजित पवार हे जाणून बुजून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवून ऊर्जा खात्याची बैठक घेतल्याने भाजप नेत्यांमध्ये देखील नाराजी पसरली असल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी सोमवारी मंत्रालयात ‘महावितरण’शी संबंधित प्रलंबित कामांचा तसेच नवीन कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यामध्ये माढा, करमाळा, अकोले, अहमदनगर, खेड, कोपरगाव, मोर्शी, कळवण, निफाड, वसमत, औंढा, बारामती आदी तालुक्यांचा समावेश होता. या बैठकीला अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार, डॉ. किरण लहामटे, देवेंद्र भुयार हे प्रत्यक्ष.
तर, संजय शिंदे, दिलीप मोहिते- पाटील, दिलीप बनकर, चंद्रकांत नवघरे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. अशी बैठक घेऊन अजित पवार हे फक्त आपल्याच गटातील आमदारांचे प्रश्न सोडवत आहेत, अशी कुजबूज सुरू झाली आहे.
या बैठकीमुळे शिंदे गटासह भाजप आमदारांमध्ये नाराजी पसरली असल्याचं सांगितलं जातंय. विशेष बाब म्हणजे गेल्याच महिन्यामध्ये राज्यातील हजारो कोटी प्रकल्पांचा आढावा घेतला होता. त्यावेळी अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारांमध्ये ढवळाढवळ करत असल्याचा आरोप देखील झाला होता.
यावरून महायुती सरकारमधील बऱ्याच मंत्र्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. आता अजित पवार यांनी थेट ऊर्जा खात्यात हस्तक्षेप करत बैठक घेतल्याने देवेंद्र फडणवीसांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजितदादांनी फडणवीसांच्या खात्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे का? अशी कुचबूज सुरू झाली आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.