Maharashtra Politics: पुण्यात मध्यरात्रीपर्यंत गुप्त खलबतं; CM शिंदेंसह, अजितदादांची अमित शहांसोबत चर्चा, आज मोठा निर्णय होणार?

Amit Shah Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी (५ ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास अमित शहा पुण्यात दाखल झाले.
maharashtra politics eknath shinde and ajit pawar meets amit shah in pune on Cabinet expansion
maharashtra politics eknath shinde and ajit pawar meets amit shah in pune on Cabinet expansion Saam TV

Amit Shah Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी (५ ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास अमित शहा पुण्यात दाखल झाले. आज ते पिंपरी-चिंचवड येथील मोरे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरात्रीपर्यंत अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली.

maharashtra politics eknath shinde and ajit pawar meets amit shah in pune on Cabinet expansion
Political News: लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का; गुजरातमधील बड्या नेत्याने दिला राजीनामा

पुण्यातील जे डब्लू मेरीट हॉटेलमध्ये राज्यातील दोन्ही नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी एक महत्वाची बैठक देखील पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. महायुती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांवर वारंवार निशाणा साधला जातोय.

गेल्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं वाटत होतं. पण त्यावेळी अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होत नवा राजकीय भूकंप घडवून आणला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांसाठी खातेवाटप करण्यात आलं. त्यावेळी सत्ताधारी शिंदे गटात धुसफूस सुरू असल्याची चर्चा समोर आली होती.

maharashtra politics eknath shinde and ajit pawar meets amit shah in pune on Cabinet expansion
Kishori Pednekar News: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

विशेष बाब म्हणजे, अजित पवार सत्तेत सामील होताच शिंदे गटातील आमदारांमध्ये धुसफूस वाढल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यातच अजित पवार यांच्यासह नव्या मंत्र्यांसाठी तत्कालीन मंत्र्यांच्या हातातील खाती काढून घेण्यात आली होती. त्यांना दुसरी खाती देण्यात आली होती.

दरम्यान, खातेवाटपानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशा चर्चा सुरू असताना विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन तोंडावर आलं. त्यामुळे महायुती सरकारने तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकला. आता पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

त्यातच अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आल्याने सरकारमधील दोन बड्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे अमित शहांसोबत चर्चा करणार असून आजच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com