Maharashtra Weather Update : राज्यातील 'या' भागावर मुसळधार पावसाचे सावट; हवामान विभागाने दिला इशारा

राज्यातील पुढील ३-४ दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Maharashtra weather update
Maharashtra weather update saam tv

रश्मी पुराणिक

Maharashtra weather update : राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावासाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच झोडपून काढलं. आताही राज्यावर मुसळधार पावसाचं सावट आहे. राज्यातील पुढील ३-४ दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Rain News Today)

Maharashtra weather update
पत्रा चाळ प्रकरणात शरद पवारांवरील आरोपांवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

ऑगस्ट महिन्यांत राज्यात उसंती घेतलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात जोरदार हजेरी लावली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. मुंबई, पुणे, ठाण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरू आहे. अशातच पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर (weather update) वाढण्याची शक्यता हवामान ( खात्याने वर्तवली आहे. हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.

'बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील ३-४ दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने विदर्भासह मराठवाड्याला 'यलो अलर्ट' दिला आहे. याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com