Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाने विदर्भासह मराठवाड्याला 'यलो अलर्ट' दिला आहे.
Maharashtra Rain News Today
Maharashtra Rain News TodaySaam TV

Maharashtra weather update : सप्टेंबर महिना सुरू होताच, राज्यात मुसळधार पावसाने (Rain) थैमान घातलं. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच राज्यात (Maharashtra) पावसाचा जोर आणखीच वाढण्याची शक्यता आहे. कारण, हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. (Maharashtra Rain News Today)

Maharashtra Rain News Today
Nashik News : पुराच्या पाण्यात स्कुटीसह तरुणी गेली वाहून; धक्कादायक VIDEO समोर

ऑगस्ट महिन्यांत राज्यात उसंती घेतलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात जोरदार हजेरी लावली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. मुंबई, पुणे, ठाण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरू आहे. अशातच पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर (weather update) वाढण्याची शक्यता हवामान ( खात्याने वर्तवली आहे. (rain news in maharashtra today marathi)

हवामान विभागाकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने विदर्भासह मराठवाड्याला 'यलो अलर्ट' दिला आहे. याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com