...तर गुवाहाटीतील आमदारांचा विचार होईल; संजय राऊतांचे सूचक विधान

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे.
Sanjay Raut Latest Marathi News, Sanjay Raut on BJP
Sanjay Raut Latest Marathi News, Sanjay Raut on BJP Saam TV

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ३८ आमदारांसह बंड केल्याचे समोर आले. याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४२ आमदार असल्याचा दावा सकाळी करण्यात आला. या संदर्भात फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या संदर्भात आता शिवसेनेच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

भाजपने शिवसेनेच्या आमदारांना फसवून गुजरातला घेऊन गेले आहेत, भाजपने त्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी सध्या कितीही फोटो, व्हिडिओ पाठवले असले तरी त्यातील २१ आमदारांचा संपर्क झाला आहे. ते आमदार ज्यावेळी मुंबईत येतील तेव्हा ते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देतील, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Sanjay Raut Latest Marathi News, Sanjay Raut on BJP
एकनाथ शिंदे शक्तिप्रदर्शन करत असताना आलेला तो फोन कोणाचा?

'जे आमदार या क्षणी महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, या सर्व आमदारांची इच्छा असेल की महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा तर त्यांनी मुंबईत यावे. उद्धव ठाकरेंसमोर मागणी करा विचार होईल, २४ तासात त्यांनी येऊन सांगावे विचार होईल, असे सूचक विधान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

Sanjay Raut Latest Marathi News, Sanjay Raut on BJP
एकनाथ शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क; संजय राऊतांचा दावा

२१ आमदारांचा आमच्याशी संपर्क

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या (ShivSena) ४२ आमदारांनी बंड केल्याचा दावा करण्यात आला, या संबंधित व्हिडिओ, आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवा दावा केला आहे. एकनाथ शिंदें यांच्या ताब्यात असलेल्या २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झालेला आहे, ते आमदार आमच्याशीच आहेत, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. (Maharashtra Political Crisis)

भाजपने (BJP) शिवसेनेच्या आमदारांना फसवून गुजरातला घेऊन गेले आहेत, कोणी सध्या कितीही फोटो, व्हिडिओ पाठवले असले तरी त्यातील २१ आमदारांचा संपर्क झाला आहे. ते आमदार ज्यावेळी मुंबईत येतील तेव्हा ते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देतील, असं संजय राऊत म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com