पाच सदस्यीय समिती करणार 10च्या निकालाच्या क्रॅश वेबसाईटची चौकशी

बराच वेळ उलटून गेल्यानंतरही वेबसाईट सुरु न झाल्याने निकालाची वेबसाईट हॅक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.
पाच सदस्यीय समिती करणार 10च्या निकालाच्या क्रॅश वेबसाईटची चौकशी
पाच सदस्यीय समिती करणार 10च्या निकालाच्या क्रॅश वेबसाईटची चौकशीSaam tv

दोन दिवसांपुर्वी दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra 10th result) झाला. त्यानंतर काही तासातच निकालाची वेबसाईच क्रॅश झाली. बराच वेळ उलटून गेल्यानंतरही वेबसाईट सुरु न झाल्याने निकालाची वेबसाईट हॅक (Hack) झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता राज्यसरकारने पाच सदस्यीय चौकशी समितीची (A five-member committee) स्थापना केली आहे. ही चौकशी समिती आपला अहवाल 15 दिवसात देणार आहे. (A five-member committee will investigate the crash website of 10 results)

पाच सदस्यीय समिती करणार 10च्या निकालाच्या क्रॅश वेबसाईटची चौकशी
"कोरोनाच्या काळात राजकीय नेत्यांनी स्वतःला निर्बंध घालणे गरजेचे''

या समितीत,

१ आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे- अध्यक्ष

२ सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे प्रतिनिधी- सदस्य

३ उपसचिव (उद्योग), उद्योग उर्जा व कामगार विभाग,मंत्रालय- सदस्य

४ तांत्रिक सल्लागार, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग,मंत्रालय,मुंबई - सदस्य,

५ उपसंचालक (प्रशासन), आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय सदस्य सचिव

यांचा समावेश करण्यात आला आहे.

*समितीने खालील बाबींची तपासणी/चौकशी करून आपला अहवाल १५दिवसात शासनास सादर करायाचा आहे....

१ निकालापूर्वी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी सर्व सबंधितांसोबत बैठक आयोजित केली होती किंवा कसे?

२ निकाल घोषित करण्यासंबंधात राज्य मंडळातील संबंधित तांत्रिक सल्लागारांना याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती का?

३.संकेतस्थळाची देखभाल करणाऱ्या संबंधीत कंपनीला निकाल घोषित करण्याबाबत

पूर्वसूचना देण्यात आली होती का?

४ इयत्ता १० वी च्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या खुप मोठी असल्यामुळे निकाल घोषित करण्याच्या अनुषंगाने संकेतस्थळाची पूर्व तपासणी (Trial run) करण्यात आली होती का?

४ निकाल घोषित करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतेच्या सर्वरचा (Server) वापर

करण्यात आला होता का?

६ भविष्यात अशाप्रकारची आपत्कालिन परिस्थिती उद्भवू नये यासाठी उपाय योजना सूचित करणे...

७ राज्यमंडळाचे संकेतस्थळ कोलमडल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी जबाबदार संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करणे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com