SSC Result 2022 : आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा : मुख्यमंत्री ठाकरे

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
SSC Result 2022 : आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा : मुख्यमंत्री ठाकरे
Uddhav Thackeray Saam Tv

रुपाली बडवे

मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ % इतका लागला आहे. यंदाही दहावीचा निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९७.७६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९६.०६ टक्के आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. (Maharashtra SSC result 2022 Latest News updates)

Uddhav Thackeray
SSC Result: राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के; जाणून घ्या निकालाची वैशिष्ट्ये

' शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे पार केला आहे, या यशासाठी आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ! आता पुढील शैक्षणिक वाटचालीत करिअर म्हणून वेगवेगळी क्षेत्रं खुणावत असतील. त्यामध्ये उज्ज्वल यश मिळविण्यासाठी प्रयत्नपूर्वक आणि डोळसपणे पावले टाका. अभ्यासात मेहनतीची तयारी ठेवा, यश निश्चितच मिळेल. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा, असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना अभिनंदनपर संदेश दिला आहे. अजित पवार संदेशात म्हटले, 'यंदा 96.94 टक्के विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा असला तरी अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत'.

Uddhav Thackeray
Ranji Trophy : मुंबईच्या जयस्वालची यशस्वी खेळी; झळकविले तिसरे शतक

'शैक्षणिक कारकिर्दीच्या बरोबरीनं आपलं व्यक्तिमत्व अष्टपैलू, सर्वांगसुंदर घडविण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कला, क्रीडा, छंद आणि कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा. शैक्षणिक कारकिर्द ठरवण्यासाठी योग्य शाखा निवडण्याचा दहावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा', असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com