दहावी -बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; कधी होणार परीक्षा,जाणून घ्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्ममिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे (Exam) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Maharashtra 10th, 12th Exams
Maharashtra 10th, 12th Examssaam tv

सचिन जाधव

Maharashtra 10th, 12th Exams 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्ममिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे (Exam) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २- मार्चपर्यंत असणार आहे. तर दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाने दिली आहे .

Maharashtra 10th, 12th Exams
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर वन, युतीला जनतेचा स्पष्ट कौल, बावनकुळे म्हणाले...

राज्य मंडळातर्फे सप्टेंबर महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येते. त्यानुसार राज्य मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे. २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार देशात झाल्यानंतर गेल्या दोन वर्षात सप्टेंबरमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले नव्हते. मात्र, यंदाच्या वर्षी राज्य मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. सदर वेळापत्रक विद्यार्थ्यांचा अभ्यासाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी सदर वेळापत्रक जाहीर केले आहे.

दरम्यान, राज्य मंडळाने संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा माहितीसाठी दिली आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरुपाचे वेळापत्रक अंतिम असेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी वेळापत्रकांची खात्री करून घ्यावी. तसेच व्हाट्सअॅप आणि इतर माध्यमावर व्हायरल झालेले वेळापत्रकाला ग्राह्य धरू नये, असे राज्य मंडळाने सांगितले आहे.

Maharashtra 10th, 12th Exams
Amarinder Singh: कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश; महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याची शक्यता

दहावी -बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा २ मार्चला सुरू होणार आहे.

बारावीची परीक्षेचा कालावधी : २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३

दहावीच्या परीक्षेचा कालावधी : २ मार्च ते २५ मार्च २०२३

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com