Breaking : राज्य सरकारचा नागरिकांना दिलासा; इंधनाचे दर केले कमी

पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV

मुंबई : इंधनदरवाढीने (Petrol) होरपळलेल्या वाहनधारकांना केंद्र सरकारनं काल मोठा दिलासा दिला. पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डीझेल ७ रुपयांनी स्वस्त केले. आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही इंधनावरील दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल २ रुपये ८ पैसे तर डिझेल १ रुपये ४४ पैशांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने आज २२ मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता ८० कोटी रुपये महिन्याला आणि १२५ कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३ आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.

Uddhav Thackeray
मोदी सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल ९.५ रुपये, डीझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार

केंद्र सरकारनेही काल कमी केले कर

इंधनदरवाढीने (Petrol) होरपळलेल्या वाहनधारकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डीझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, शनिवारी ही घोषणा केली. या सोबतच घरगुती गॅसचे एलपीजी गॅस आता २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. हजाराच्या घरात पोहोचलेला गॅस सिलिंडर आता उज्ज्वला योजनेंतर्गत दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे.

इंधनावरील अबकारी कर कमी केला जाणार आहे. अबकारी कर कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डीझेल स्वस्त होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपशासित राज्यांमध्ये याची अंमलबजावणी लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशभरात पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) महागाई विरोधात काँग्रेसने आंदोलन सुरु केले होते. सिलेंडर बाबतीतही मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. रशिया-युक्रेन युध्दा दरम्यान वाढलेल्या महागाईमुळे केंद्र सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. यावर आता हा निर्णय घेतला आहे.

गेल्या सात महिन्यातील हा दुसऱ्यांदा निर्णय घेतला आहे. समोर कोणत्याही निवडणुका नसताना हा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलने किंमती शंभरच्या पुढे गेल्या होत्या. त्यामुळे देशातील महागाई वाढली होती. त्यामुळे इंधनावरील कर कमी करण्याची मागणी करण्यात आली होती.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com