Foxconn vedanta: "महाराष्ट्र को क्या मिला? लॉलीपॉप लॉलीपॉप, पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलाच तापलं आहे.
Pune NCP Andolan
Pune NCP AndolanSaam Tv

पुणे - वेदांत (Vedanta)-फॉक्सकॉन कंपनीचा महाराष्ट्रात प्रकल्प प्रस्तावीत होता हा प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याचे बोलले जात होते. या प्रकरणी दोन दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकावर हल्लाबोल सुरू केला आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलाच तापलं आहे.

पुण्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नेत्वृाखाली आंदोलन चालू आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादीचे आंदोलन सुरू आहे."महाराष्ट्र को क्या मिला ? लॉलीपॉप लॉलीपॉप" अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दुसऱ्या दिवशी भाजप सरकार विरोधात पुण्यात आंदोलन सुरू असून या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळेदेखील सहभागी झाल्या.

वेदांता हा एक लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता परंतु सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता गुजरातमध्ये जाणार आहे, यामुळे महाराष्ट्रातील हजारो युवक बेरोजगार होणार असलायचं मत सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केलं.

Pune NCP Andolan
सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी? पवारांचा CM शिंदेंना टोला

राज्य आणि देशासमोर बेरोजगारीचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि राज्याच्या हितासाठी एकत्र यावं. पंतप्रधानांना भेटून आपला प्रकल्प परत आणावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com