प्रसाद लाड की भाई जगताप, कोण मारणार बाजी?; उद्याच्या निकालावर सर्वांच लक्ष

विधान परिषदेसाठी उद्या निवडणूक होणार आहे.
Vidhan Parishad Election
Vidhan Parishad ElectionSaam Tv

मुंबई: राज्यात उद्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक (Election) होणार आहे. भाजपने राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा एका जागेवर पराभव केल्यामुळे ही निवडणूक आता प्रतिष्ठेची झाली आहे. १० जागांसाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. काँग्रेसने (Congress) आपला दुसरा उमेदवार पाठिमागे न घेतल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. उद्या सोमवारी २० जून रोजी मतदान होणार आहे. सर्व पक्षांचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. (Vidhan Parishad Election)

काँग्रेसकडून भाई जगताप तर भाजपकडून (BJP) प्रसाद लाड रिंगणात आहेत. यापार्श्वभूमीवर मतांची फोडाफोडी होऊ नये म्हणून राज्यातील भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या चारही प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना मुंबईतील विविध हॉटेलांमध्ये ठेवले आहे. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप विधानपरिषदच्या रिंगणात आहेत.

Vidhan Parishad Election
हॉटेलची उधारी मागणारा व्यक्ती राष्ट्रवादीचा कार्यकर्ता; सदाभाऊ खोत यांनी दिला 'हा' पुरावा

विधानपरिषद निवडणुकीत मुख्य लढत ही काँग्रेसच्या (Congress) भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांच्यामध्ये होणार आहे. काँग्रेसने यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. यात भाई जगताप यांची जागा डेंजर झोनमध्ये असल्याचे बोलले जात आहे. भाई जगताप हे मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगतापांची जागा काँग्रेसकरता प्रतिष्ठेची मानली जात आहे.

भाई जगताप दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार असल्याने त्यांची मदार प्रेफरन्शीअल वोटींग आणि अपक्ष यांवर असणार आहे. काँग्रेस आमदारांचे संख्याबळ ४४ आहे.

काँग्रेस कोट्यातील मतांचे गणित

पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरेंना जिंकण्याकरता २६ मते मिळू शकतील. मात्र, भाई जगतापांना जिंकण्याकरता ८ मते कमी पडतात. यासाठी काँग्रेसकडून ८ मतांकरता जुळवाजुळव सुरु आहे. शिवसेनेकडील अतिरीक्त मते काँग्रेसकडे (Congress) वळवून घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला तर काँग्रेसची दुसरी जागा सेफ होईल, असं बोलले जात आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षांची मते काँग्रेसकडे वळवण्याचेही प्रयत्न सुरु झाले आहेत. काँग्रेसकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांसोबत काँग्रेस शिष्ठमंडळाच्या सातत्याने बैठका सुरु आहेत.

अपक्ष आणि लहान पक्षांचे गणित काँग्रेस कसे जुळवणार, समाजवादी पक्ष- सपाच्या आमदारांसोबत काँग्रेसच्या आतापर्यंत दोन बैठका पार पडल्या आहेत. मात्र, सपा आमदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसपैकी कोणाला मतदान करायचे याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत घेतला जाईल, असं सांगण्यात येत आहे. (Legislative Council elections)

Vidhan Parishad Election
पुण्यात कोयता घेऊन तरुणांची दहशत; अनेक गाड्यांची तोडफोड, गुन्हा दाखल

बहुजन विकास आघाडी

काँग्रेसकडून भाई जगतापांनी हितेंद्र ठाकुरांची भेट घेतली आहे. बविआ कोणाला मतदान करेल हे अजुनही गुलदस्त्यात आहे.

प्रहार

बच्चु कडूंनी मविआला समर्थन दिले आहे, पण कोणाला मतदान करणार हे ठरणे बाकी आहे.

शेकाप, मकाप स्वाभिमानी, क्रांतीकारी शेतकरी पार्टीने मविआला समर्थन दिले आहे. त्यामुळे ही लढत सरळ आता भाजप विरुद्ध काँग्रेस होणार आहे. उद्या भाजपचे प्रसाद लाड यांना मताधिक्य मिळते की काँग्रेसच्या भाई जगताप यांना मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Legislative Council elections)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com