
मुंबई : विधानपरिषद (MLC) निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषदेची निवडणूक देखील चुरशीची झाली. विधानपरिषदेची निवडणूक ही खरी लढत दहाव्या जागेसाठी होती. या जागेवर भाजपचे (BJP) प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात खरी लढत होती. मात्र, या लढतीत प्रसाद लाड(Prasad Lad) विजयी झाले आहेत. तर या लढतीत अधिक मते मिळवत भाई जगताप विजयी झाले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे (Congress) चंद्रकांत हंडोरे यांना कमी मते मिळाल्याने पराभव स्वीकारावा लागला आहे . आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पराभव झाल्याने महाविकास आघाडीला (MVA) मोठा झटका बसला आहे. (Maharashtra vidhan parishad election 2022 )
विधानपरिषदेच्या निवडणुकीत चुरशीची लढत भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात पाहायला मिळाली. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी अपक्ष आमदार आणि घटक पक्षांच्या आमदारांना भाजपच्या नेत्यांनी भेटगाठी घेतल्या. भाजप नेत्यांच्या या भेटीगाठींना यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या दहाव्या जागेवर भाजपचे प्रसाद लाड विजयी झाले आहेत. प्रसाद लाड यांचा विजय होताच भाजपच्या गोटात विजयाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि विशेष काँग्रेससाठी विधानपरिषदेची प्रतिष्ठेची होती. मात्र, या निवडणुकीत भाई जगताप यांना चंद्रकांत हंडोरे यांच्यापेक्षा अधिक मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे भाई जगताप जिंकले आहेत. तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे.
चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्याने काँग्रेसने पक्षाचा आदेश त्यांत्याच आमदारांनीच धुडकावला आहे. एकंदरीत काँग्रेस नेत्यांनी पक्षशिस्तीला हरताळ फासला आहे. या निवडणुकीत काँग्रेस पहिला उमेदवार पराभूत झाला आहे. तर दुसरा उमेदवार जिंकला आहे. काँग्रेसचा उमेदवार पराभव झाल्याने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला मोठा झटका मानला जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ भाई जगताप यांच्या विजयावर समाधान मानावे लागले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.