
मुंबई: महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का देत भाजपने विधान परिषदेत पाच जागांवर विजय मिळवला. भाजपने (BJP) मोठा जल्लोष सुरु केला आहे. यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली. महाविकास आघाडीवर सरकारवर आमदारांचा विश्वास नाही, म्हणून आमदारांनी आमच्या पाचव्या उमेदवाराला मत दिली, त्यामुळे आमचा प्रचंड मोठा विजय झाला आहे, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) म्हणाले.
आमचा संघर्ष सत्तेकरता नाही, आमचा संघर्ष समाजासाठी आहे. मी अपक्षांचेही आभार मानतो, त्यांनी आमचे पाच उमेदवार निवडून आणले आहेत. आम्ही समाजासाठी लढणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.
सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे नाराज आमदारांनी आम्हाला मदत केली, आमच्या चार मतदारांनी जास्त मत घेतली. माझे सहकारी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टीळक यांचे मी आभार मानतो, त्यांनी या विजयाला हातभार लावला. महाराष्ट्रात आता एक नवीन परिवर्तनाची नांदी आपल्याला पाहायला मिळत आहे, आमचा संघर्ष असाच चालू राहील आणि लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच आमचा संघर्ष थांबेल, अंसही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या सरकारमधील असंतोष आता बाहेर येत आहे. आमचे नेते नरेंद्र मोजी ज्या प्रकारे देशाला परिवर्तीत करत आहेत, मोदी यांच्या पाठिशी महाराष्ट्र उभा आहे, एक परिवर्तनाची नांदी आपल्याला पाहायला मिळत आहे, असंही फडणवीस (Devendra Fadnvis) म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेसाठी आज निवडणूक झाली. ही निवडणूक (Election) राज्यसभेसारखीच चुरशीची झाली. भाजपने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली होती. या निवडणुकीत पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता लागली होती. आता या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. भाजपचे प्रसाद लाड वियजी झाले आहेत.
मत मोजणीच्या सुरुवातीला राष्ट्रवादीच्या (NCP) रामराजे नाईक निंबाळकर यांचे एक मत बाजूला काढले असल्याची माहिती मिळाली. तर भाजपचेही एक मत बाजूला काढल्याचे समोर आले. भाजपचे प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह चारही उमेदवार विजयी झाले आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.