महाविकास आघाडीला धक्का; अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मतदानाची परवानगी SC ने फेटाळली

आज विधान परिषदेसाठी निवडणूक होत आहे.
महाविकास आघाडीला धक्का; अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मतदानाची परवानगी SC ने फेटाळली
anil deshmukh, nawab malik, mlc election, breaking newssaam tv

मुंबई: विधान परिषद निवडणूक सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता, हा अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याचे समजत आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठीही मलिक आणि देशमुख यांना मतदानाची परवानगी देण्यात आली नव्हती. आता विधान परिषदेसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची (Congress)दोन मत कमी झाली आहेत.

anil deshmukh, nawab malik, mlc election, breaking news
सांगली : डॉक्टर, शिक्षकबंधूसह कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या

विधान परिषदेसाठी आता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधान परिषदेचा निकाल हाती येणार आहे. काँग्रेसचे भाई जगताप विरुद्ध भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत होणार आहे.

मलिक आणि देशमुख यांना हायकोर्टानेही नकार दिला होता. आता सुप्रिम कोर्टानेही मतदानाचा अधिकार नाकारला आहे. अनिल देशमुख यांना १०० कोटी खंडणी प्रकरणी अटकेत आहेत.

anil deshmukh, nawab malik, mlc election, breaking news
मविआ सरकारच्या अहंकाराचा पराभव निवडणुकीत होईल; सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल

आमची तीन 'त्यांना' देणार : हितेंद्र ठाकूर

मविआ (mva) आणि भाजपसाठी (bjp) प्रतिष्ठेची बनलेल्या या निवणुकीत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची भुमिका महत्वाची मानली जात आहे. ठाकूर यांच्या आघाडीकडे तीन मत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकूर यांची विविध पक्षातील मान्यवरांनी भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले हाेते.

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी विरारहून पावणे १२ वाजता मुंबईस रवाना झाला. यावेळी माध्यमांशी ठाकूर यांनी संवाद साधला. ज्यांनी विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे त्यांना आमचे आमदार मतदान करतील असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले सर्वांनीच आमच्याशी येऊन चर्चा केली आहे. या चर्चेत ज्यांनी आम्हांला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे त्यांचा आम्ही विचार करणार आहाेत.

आपल्या आघाडीवर घाेडेबाजाराचा आराेप हाेत आहे या प्रश्नावर ठाकूर यांनी कोणी घोडेबाजार केला याची चौकशी करावी अशी मागणी केली. दरम्यान परदेशात गेलेले हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव आमदार क्षितिज ठाकूर हे देखील मुंबईत दाखल झाले आहेत. ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी जे आम्हांला भविष्यात सहकार्य करणार आहेत त्यांना मत देणार असे सांगत असल्याने नक्की त्यांच्या आघाडीची मतं काेणााल जाणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात राहिले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com