मविआ सरकारच्या अहंकाराचा पराभव निवडणुकीत होईल; सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल

काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे.
sudhir mungantiwar
sudhir mungantiwarSaam Tv

मुंबई: राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक (Election) होत आहे. महाविकास आघाडी- भाजपकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. एकीकडे भाजपचे (BJP) आमदार राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंना मदत करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. (Legislative Council Election Process)

अपक्ष आमदार आम्हाला सहकार्य करणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही महाविकास आघाडीचा पराभव होणार आहे. या सरकारने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. आमदारांच्या नाराजींचा फायदा घेऊन आम्ही सरकार स्थापन करणार नाही, असंही सुधीर मुनगंटीवार (Sudhir on Mungantiwar) म्हणाले.

sudhir mungantiwar
राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पूर्ण

विधान परिषदेची निवडणूक पूर्ण क्षमतेने लढवली आहे, त्यामुळे आमचा यात विजय नक्कीच होईल. एकनाथ खडसे यांच्या संदर्भात बोलताना मुनगंटीवर म्हणाले, भारतीय जनता पक्षातील आमदारांच्यामध्ये जरी त्यांचे चांगले संबंध असले तरीही भाजपचे आमदार तत्वात बदल करणार नाही. ते भाजपच्याच उमेदवाराला मतदान करणार आहेत, असा विश्वासही सुधीर मुनगंटीवार (Sudhir on Mungantiwar) यांनी व्यक्त केला.

sudhir mungantiwar
Maharashtra Vidhan Parishad Election 2022 : आमची तीन 'त्यांना' देणार : हितेंद्र ठाकूर

आमची तीन 'त्यांना' देणार : हितेंद्र ठाकूर

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Parishad Election 2022) रिंगणात असल्याने यंदाची निवडणूक चुरशीची झाली आहे. विधानपरिषदेच्या (mlc) निवडणुकीसाठी दुपारी 12 वाजेपर्यंत सुमारे 203 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अद्याप मविआ आणि भाजपसह अन्य पक्षातील आमदारांचे मतदान करायचे राहिले आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहील.

मविआ (mva) आणि भाजपसाठी (bjp) प्रतिष्ठेची बनलेल्या या निवणुकीत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची भुमिका महत्वाची मानली जात आहे. ठाकूर यांच्या आघाडीकडे तीन मत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकूर यांची विविध पक्षातील मान्यवरांनी भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले हाेते.

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी विरारहून पावणे १२ वाजता मुंबईस रवाना झाला. यावेळी माध्यमांशी ठाकूर यांनी संवाद साधला. ज्यांनी विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे त्यांना आमचे आमदार मतदान करतील असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले सर्वांनीच आमच्याशी येऊन चर्चा केली आहे. या चर्चेत ज्यांनी आम्हांला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे त्यांचा आम्ही विचार करणार आहाेत. (Maharashtra Legislative Council Election 2022 News Updates)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com