Maharashtra Weather Updates
Maharashtra Weather UpdatesSaam TV

Weather Alert : पुण्यात उन्हाचा चटका वाढणार; विदर्भावर अवकाळीचं संकट कायम, वाचा हवामान विभागाचा अंदाज...

Maharashtra Weather Updates : गेल्या आठवडाभरापासून ढगाळ असलेले वातावरण आता निवळले आहे. ढगाळ वातावरण निवळताच उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे.

Maharashtra Weather Updates : गेल्या आठवडाभरापासून ढगाळ असलेले वातावरण आता निवळले आहे. ढगाळ वातावरण निवळताच उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे पुण्यासह परिसरात पुढील तीन दिवस उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिवसभर आकाश निरभ्र राहिल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Weather Updates
Gold Silver Price : खुशखबर! आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्याचा भाव घसरला, चांदीही झाली स्वस्त; वाचा आजचे नवे दर

पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानात येत्या दोन ते तीन दिवसांत ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी शहरातील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. आकाश दिवसभर अंशतः ढगाळ होते. मात्र, कोठेही पावसाची नोंद झाली नाही.

तसेच दिवसभरात उन्हाचा कडाकाही चांगलाच जाणवत होता. राज्यातही आता विविध भागात सुरू असलेल्या वादळी पावसाने उघडीप दिली आहे. दुसरीकडे मंगळवारी (ता. २१) विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर राज्यात उन्हाचा चटका वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

Maharashtra Weather Updates
Serial Kisser Arrested : अचानक यायचा आणि महिलांना किस करून पळायचा; 'सीरियल किसर' पोलिसांच्या ताब्यात

राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे कायम आहे. दक्षिण कर्नाटकपासून मराठवाडा, पश्चिम विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू ते छत्तीसगड पर्यंत विस्तारला आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऐन मार्च महिन्यात आलेल्या अवकाळीमुळे मेहनतीने कष्ट करुन पिकवलेल्या सोन्यासारख्या धान्यावर पाणी सोडावं लागतंय की काय अशी भीती निर्माण झालेय..शेतीचं होणाऱ्या अतोनात नुकसानानं शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालाय.. केवळ अवकाळी पाऊसच नाही तर मोठ्या प्रमाणात गारपिटीचा वर्षावही होत असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com