Maharashtra Kesari: कोण मारणार महाराष्ट्र केसरीच मैदान? शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढत

माती विभागातून महेंद्र गायकवाड तर गादी विभागातून शिवराज राक्षेने मैदान मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
Maharashtra Kesari Final
Maharashtra Kesari FinalSaamtv

Pune: पुण्यात सध्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रंगला आहे. आज या सामन्याचा अंतिम दिवस असून महाराष्ट्र केसरीची गदा कोण उंचावणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख तर यांच्यात लढत झाली. या लढतीत महेंद्र गायकवाड ने सिकंदर शेखला आस्मान दाखवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. (Maharashtra Kesari)

Maharashtra Kesari Final
KL Rahul Wedding : केएल राहुलच्या लग्नाची तारीख ठरली; बीसीसीआयच्या एका ट्विटने सोशल मीडियावर चर्चा

स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख तर यांच्यात लढत झाली. या लढतीत महेंद्र गायकवाड ने सिकंदर शेखला आस्मान दाखवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तीन मिनिटाच्या पहिल्या फेरीत दोघेही आक्रमक खेळले. दरम्यान, कुस्ती करून गुण मिळवण्यासाठी दोघांनाही वॉर्निंग दिली होती.

Maharashtra Kesari Final
SBI Interest Rate Hike : एसबीआयच्या ग्राहकांना दणका; कर्जे महागली, EMI वाढणार

तर दुसरीकडे गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे या दोन मित्रांची लढत झाली. सुरुवातीपासून शिवराज राक्षे यानं सामन्यावर पकड मिळवली. हर्षवर्धन सदगीरवर शिवराज राक्षेनं एकतर्फी विजय मिळवला. आता अंतिम फेरीत शिवराज राक्षे विरुद्ध महेंद्र गायकवाड लढत होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार जीप आणि पाच लाखांचे रोख बक्षीस मिळणार आहे. उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. (Pune News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com