गृहमंत्री वळसे पाटलांच्या कार्यपद्धतीबाबत महाविकास आघाडीमध्ये नाराजी

राष्ट्रवादीत ही गृहमंत्री वळसे पाटील यांच्या विरोधात नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे.
गृहमंत्री वळसे पाटलांच्या कार्यपद्धतीबाबत महाविकास आघाडीमध्ये नाराजी
गृहमंत्री वळसे पाटलांच्या कार्यपद्धतीबाबत महाविकास आघाडीमध्ये नाराजी Saam Tv News

मुंबई: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (HM Dilip Walse Patil) यांच्या कार्यपद्धतीबाबत महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. गृहखात्यावर योग्य पद्धतीने पकड नसल्याने सरकारमधील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का बसत आहे. राज्यात झालेली दंगल असो, केंद्रीय यंत्रणांनी राज्यात येऊन दहशत वाद्यांन केलेली अटक असो , किरिट सोमय्या प्रकरण हाताळण्यात पोलिसांना आलेले अपयश अशा विविध घटनांवरून मित्रपक्षांमध्ये नाराजी असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीत ही गृहमंत्री वळसे पाटील यांच्या विरोधात नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे.

गृहमंत्री वळसे पाटलांच्या कार्यपद्धतीबाबत महाविकास आघाडीमध्ये नाराजी
रायगड जिल्हा परिषदेला स्वतःच्याच मालकिच्या जागेची माहिती नाही; सभेत मुद्दा गाजला

गृहमंत्री उपलब्ध नसतात, त्यांच्याशी संपर्क करताना अडचणी येतात. गृहमंत्री कार्यालयाकडून सहकार्य मिळत नाही, अशा अनेक तक्रारी पक्षतून येत आहेत. गेल्या काही महिन्यात राज्यातील महिला अत्याचार घटनांवरून विरोधकांनी सरकारला टार्गेट केलं होतं त्यामुळे वळसे पाटील यांच्या विरोधात नाराजीचा सूर उमटला होता. आर्यन खान प्रकरणात SIT स्थापना व्हावी ही मागणी नवाब मलिक करत होते, पण SIT स्थापन झाल्यावर ज्या पद्धतीने कामकाज सुरुये त्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राज्यात आर्यन खान प्रकरण असो ईडीच्या नोटीस असो, IT चे छापे असो, यामध्ये राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार संघर्ष पाहायला मिळत आहे, तशी टीका राज्यातील सत्ताधारी करत आहेत. परंतु प्रशासकीय यंत्रणा या स्वतंत्रपणे त्याचं काम करत असल्याचं राज्यातील विरोधी पक्षाचे नेते म्हणत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com