Mahavikas Aghadi: मोदींच्या भ्रष्टाचारविरोधी सूचक वक्तव्याने मविआत खळबळ? वर्षावर पवार, मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक

शरद पवार, मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSaam Tv

रश्मी पुराणिक -

मुंबई: महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे (Mahavikas Aghadi Important Meeting At Varsha Bungalow In The Presence Of CM Uddhav Thackeray And Sharad Pawar).

Mahavikas Aghadi
PM Narendra Modi: भाजपला चारही दिशांहून आशीर्वाद मिळालाय - मोदी

पाच राज्यांच्या निवडणूक निकालात भाजपने चार राज्यावर आपला झेंडा फडकवला आहे. त्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचं चित्र आहे. पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी काल भ्रष्टाचारवर सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महाविकासआघाडीची ही महत्वाची बैठक पार पडत आहे. त्यामुळे मोदींच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ माजल्याचं दिसतंय.

शुक्रवार 11 मार्च म्हणजेच आज संध्याकाळी सहा वाजता शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

भ्रष्टाचार मुक्त देश करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जेव्हाही कुठली कारवाई होते. तेव्हा त्या कारवायांना वेगळा रंग दिला जातो. तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, असं वक्तव्य काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडी अडचणीत येऊ शकते. ज्या पद्धतीने कारवाया होत आहेत, तर सरकार अस्थिर होऊ शकते, या संपूर्ण पार्श्वभूमिवर आज माहविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com