
मुंबई : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवशक्त- भीमशक्ती आघाडीची घोषणा केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीलाही सोबत येण्याचं आवाहन केलं होत. मात्र आता प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्याविरोधात टीका केली आहे.
शरद पवार भाजपसोबत आहेत. महाविकास आघाडीत जाण्याची मुळीच इच्छा मला नाही. प्रकाश आंबेडकरांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवारांबाबत बोलताना आदराने बोलावं. सत्तेसाठी काहीही सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता. (Latest Marathi News)
त्यामुळे शिवसेनेशी आघाडी झालेला पक्ष अशी टीका करत असेल तर राष्ट्रवादी सहन करणार का? याचा परिणाम महाविकास आघाडीवर होईल का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी राहील का? असा देखील प्रश्न आहे.
ठाकरे-आंबेडकर युतीनंतर नेमकं काय झालं?
शिवशक्ती भीमशक्ती घोषणा झाली. याच पत्रकार परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीलाही सोबत घेण्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्ये केली.त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची मातोश्रीवर आगामी निवडणुकांबाबत प्राथमिक चर्चा झाली.
या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका सुरू केली.शरद पवार भाजपसोबत आहेत, असं बोलून त्यांनी राष्ट्रवादीला डिवचले. मात्र प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानतंर जितेंद्र आव्हाडांनी नाव न घेत प्रकाश आंबेडकरांना आणि शिवसेनेला इशाला दिला.
जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत थेट इशारा देत म्हटलं की, महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही.तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी. सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.