Mahavikas Aghadi Andolan In Navi Mumbai : मराठा आंदोलकांवरील हल्ल्याचा नवी मुंबईत 'मविआ'कडून निषेध, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Maratha Andolan : मराठा समाजावरील अन्याय दूर करा अशी मागणी आंदाेलकांनी केली.
Navi Mumbai, Maratha Reservation
Navi Mumbai, Maratha Reservationsaam tv

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai Maratha Andolan : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (antarwali sarathi) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) उपोषणास बसलेल्या आंदाेलकांवर केलेल्या लाठीचार्जचा आज (बुधवार) नवी मुंबईत महाविकास आघाडीने निषेध नाेंदविला. दरम्यान मराठा आंदाेलकांना पाठिंबा देण्यासाठी आज सांगली जिल्ह्यात देखील सकल मराठा समाजाने आंदाेलन पुकारलं आहे. (Maharashtra News)

Navi Mumbai, Maratha Reservation
Bharat Or India? संभाजीराजे दिल्लीत दाखल, इंडिया शब्द बदलून भारत करणार असाल तर... (पाहा व्हिडिओ)

नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीने आंदोलन केले. या आंदाेलनात युवा वर्ग, महिला माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. मराठा समाजावरील अन्याय दूर करा अशी मागणी आंदाेलकांनी केली.

Navi Mumbai, Maratha Reservation
Congress Samvad Yatra 2023 : पंतप्रधानपदावरून गडकरी मोदींचे भांडण सुरू : नाना पटाेले

जालना येथे आंदाेलकांवर झालेला लाठीहल्ला हा सरकार पुरस्कृत असल्याने शिंदे फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करीत असल्याचे आंदाेलकांनी नमूद केले. यावेळी आंदाेलकांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला आंदाेलकांनी जोडे मारले. यावेळी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com