मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना; विमानाला ओढणाऱ्या वाहनाला भीषण आग

मुंबई विमानतळावर दुर्घटनेची मोठी घटना समोर आली
Mumbai Airport
Mumbai Airport Saam Tv

मुंबई: मुंबई विमानतळावर दुर्घटनेची मोठी घटना समोर आली आहे. येथे प्रवाशांनी (passengers) भरलेल्या विमानाला (plane) धक्का देणाऱ्या वाहनाला अचानकपणे आग (Fire) लागली आहे. पण येथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला आहे. हा अपघात V२६R स्टँडवर घडला आहे. यामध्ये विमानाचे नुकसान जास्त प्रमाणात झाले नाही. पण विमानाला धक्का देणारे वाहन मात्र संपूर्ण जळून खाक झाले आहे. आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन (Firefighting) दलाने आग आटोक्यामध्ये आणली आहे. तरीदेखील कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झाली नाही.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहन मुंबईहून (Mumbai) जामनगरला जाणाऱ्या फ्लाइटला पुशबॅक देणार होते. पण पुशबॅक देण्याअगोदरच अचानक या वाहनाने पेट घेतला आहे. या वाहनामध्ये नक्की आग कशामुळे लागली याची कोणती देखील माहिती अद्याप आजून समोर आली नाही. संबंधित वाहन एअर इंडियाच्या AIC-६४७ या मुंबईहून जामनगरला (Jamnagar) जाणाऱ्या फ्लाइटला पुशबॅक करत होते. यावेळीच आगीची दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त वाहनाने या फ्लाइटला पुशबॅक देण्यात येणार होते. त्या विमानामध्ये ८५ लोक होते.

Mumbai Airport
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू

अपघाताची ही घटना घडताच विमानतळावरमोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. मात्र, विमानतळ प्रशासनाने तत्परता दाखवत आग विझवली आहे. या दुर्घटनेमध्ये विमानाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. या विमानाने १२ वाजून ४ मिनिटांनी उड्डाण केले आहे. एअर इंडियाच्या विमानाला पुशबॅक देण्याकरिता आणलेला हा ट्रॅक्टर विमानाच्या अगदी जवळ उभा होता. यावेळी या ट्रॅक्टरला आग लागली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली? याविषयी कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नाही. मात्र, अग्निशमन दलाने ही आग विझवली आहे. या अपघातात कोणती देखील जीवित हानी झाली नाही.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com