रेल्वेच्या सीआयबी, RPFची मोठी कारवाई; १ कोटी रकमेसह सोन्याची बिस्किटे जप्त

हैद्राबादकडून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यवधी रुपयांच्या अवैध सामानाची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वेच्या RPFव CIB अधिकार्‍यांना मिळाली होती.
Railway News
Railway Newsप्रदीप भणगे

कल्याण  : हैद्राबादकडून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यवधी रुपयांच्या अवैध सामानाची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वेच्या आरपीएफ व सीआयबी अधिकार्‍यांना मिळाली होती. आरपीएफ व सिआयबीच्या पथकाने या माहितीच्या आधारे सापळा रचत कल्याण रेल्वे स्थानकावर आलेल्या देवगिरी एक्स्प्रेसमधून (Devagiri Express) पाच संशयित इसमाना ताब्यात घेतलं.

गणेश मरिबा भगत, मयूर वालदास भाई कापडी, नंदकुमार वैध, संजय मनिककामे, चंदू माकणे अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून १ कोटी १ लाख ५५ हजार रुपयाची रोकड आणि ९ लाख १४ हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे (Gold Biscuits) जप्त केली आहेत. 

 रेल्वे (Railway) मार्गाने होणारी अवैध सामानाची तस्करी रोखण्यासाठी रेल्वेचे सर्व विभाग सक्रीय झाले आहेत. काल बुधवार २५ मे रोजी नांदेडकडून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यावधी रुपयाच्या अवैध मालमत्तेची वाहतूक केली जात असल्याची माहिती रेल्वेच्या सीआयबी आणि आरपीएफ स्टाफला मिळाली होती.

हे देखील पाहा -

हैद्राबादकडून मुंबईच्या (Mumbai) दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून अवैध सामानाची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वेच्या आरपीएफ व सीआयबी अधिकार्‍यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सीआयबी निरीक्षक सुनील शर्मा, उपनिरीक्षक जीएस एडले, हेड कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचला.

आरपीएफचे (RPF) निरीक्षक प्रकाश यादव आणि तुकाराम आंधळे यांना तीन वेगवेगळ्या बोगीमध्ये ५ जण संशयित रित्या प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. या पाच जणांना सामानासह ताब्यात घेत त्यांच्या सामानाची झडती घेतली असता एकाच पार्सलमध्ये ९ लाख १४ हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे असलेली ३ बॉक्स तर इतर चौघांच्या पार्सलमध्ये मिळून १ कोटी १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड असल्याचे आढळून आले.

Railway News
तरुणाला विवाहितेचा शेवटचा प्रेमाचा कॉल आला अन् पाच जणांनी मिळून त्याचा खून केला

या पाचही जणांनी आपण वेगवेगळ्या कुरियर कंपन्यासाठी नांदेड, औरंगाबाद, परभणी मध्ये काम करत असून मस्जिद बंदर मधील संबधित कुरिअर कंपनीच्या कार्यालयात हे पार्सल पोचविण्याचे काम आपल्याला देण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, पुढील चौकशीसाठी ठाणे आयकर विभागाने या पाचही जणांना ताब्यात घेतले असून रेल्वेच्या आरपीएफ विभागाने ही रोकड आणि सोने ताब्यात घेत जप्त केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्राकडून देण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com