वसार गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

१ लाख ४० हजारांचा नवसागर मिश्रित रसायन केले नष्ट
वसार गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
वसार गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण- मलंगगड रोडवर वसार गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी हातभट्टी उध्वस्त केली आहे. १ लाख ४० हजार रुपयांचा नवसागर मिश्रित रसायन राज्य उत्पादन शुल्क विभागाने नष्ट केला आहे. वसार, कुंभार्ली, कुशिवली परिसरातील डोंगराळ भागात गावठी आणि हातभट्या दारू विक्रेते सक्रिय झाले आहेत.

हे देखील पहा-

मलंगगड भाग हा गावठी दारू निर्मितीचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो, म्हणून हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग पुन्हा एकदा या गावठी दारूच्या भट्या फोडण्याकडे वळले आहेत. दिवाळीच्या कालखंडात केलेल्या कारवाईच्या धडाक्यानंतर ही कारवाई ग्रामीण भागात थंडावली होती. आता पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा हाती घेतला असून दारू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

वसार गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
धक्कादायक! नोकरीचे आमिष दाखवून पुण्यातील विवाहितेवर बलात्कार

दुसरीकडे नेवाळी परिसरात वाढती गुन्हेगारी हे चिंतेचा विषय झाला असताना नेवाळी मध्ये अप्पर पोलीस आयुक्तांच्या पथकाने कारवाई करत किराणा दुकानामधून विक्री होणारा मद्याचा साठा पोलिसांनी जप्त करण्यात आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार भोईर हे करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com