मुंबईत पुन्हा अग्नितांडव
मुंबईत पुन्हा अग्नितांडवtwitter

Video: मुंबईत पुन्हा अग्नितांडव; मानखुर्दमध्ये गोदामांना भीषण आग

अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुंबईत - मुंबईमध्ये दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.आज पुन्हा एकदा घाटकोपर येथील मानखुर्द लिंक रोडवर मंडाला येथील भंगार बाजाराच्या गोदामाला रात्री तीनच्या सुमारास मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत सुमारे १० ते १२ दुकान जाळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आग विझवण्याचे काम सुरु आहेत.

यात काही केमिकल, लाकडी सामान, भंगार विक्रीचे साहित्य असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या, १० टँकर आणि १५० अग्निशमन दल घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

मुंबईत पुन्हा अग्नितांडव
१०० कोटी वसुली प्रकरण: परमबीर सिंंह यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन होणार?

या परिसरात सातत्याने आग लागण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहे. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आणि अवघ्या काही क्षणातच गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले. ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या असून जवळपास १५० जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com