भाजप विरोधातील लढाईत ममता बॅनर्जी ह्या महत्वपुर्ण योद्धा - संजय राऊत

काही दिवसांपुर्वीच ममता बॅनर्जी या मुंबईत आल्या होत्या, तेव्हा त्यांनी शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत, बाळासाहेब थोरात अशा अनेक नेत्यांची भेट घेतली होती.
भाजप विरोधातील लढाईत ममता बॅनर्जी ह्या महत्वपुर्ण योद्धा - संजय राऊत
भाजप विरोधातील लढाईत ममता बॅनर्जी ह्या महत्वपुर्ण योद्धा - संजय राऊतSaam Tv

मुंबई: देशात भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत लढलं पाहिजे अशी भूमिका शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मांडली आहे. काही दिवसांपुर्वीच पश्चिन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या मुंबईत आल्या होत्या, तेव्हा त्यांनी शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत, बाळासाहेब थोरात अशा अनेक नेत्यांची भेट घेतली होती. यादरम्यान त्यांना यूपीए (UPA) बाबत प्रश्न विचारला असता त्यांनी कोणती यूपीए असं म्हणत कॉंग्रेसचं महत्व कमी असल्याचा संदेश दिला होता, मात्र याला आता खासदार राऊत प्रत्तुत्तर देत प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला आहे. (Mamata Banerjee is an important warrior in the fight against BJP - Sanjay Raut)

हे देखील पहा -

संजय राऊत म्हणाले की, ममता बॅनर्जी ह्या देशाच्या मोठ्या नेता आहेत. भाजप विरोधातील या लढाईत ममताजी ह्या एक महत्वपुर्ण योद्धा आहेत आणि त्यांचा लढा प्रेरणादायी आहे. युपीएचं काय करायचं हा प्रश्न ममतांनी विचारला, ऊद्धव ठाकरेंनीही प्रश्न विचारलाय की युपीएने आक्रमक व्हायला हवे, युपीए नाही तर एनडीए नाही असंही ऊद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले अशी माहिती राऊतांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, आत्तापर्यंत तिसरी आणि चौथी आघाडी बनली, त्याचा फायदा भाजपला झाला. मग ही जी तिसरी आघाडी बनली आहे त्याचा फायदा आम्ही का घेऊ नये? आम्ही राज्यात तीन वेगवेगळे पक्ष आहोत. कांग्रेसला दूर ठेवून फ्रंट बनू शकत नाही. इतर राज्यात कांग्रेसचा बेस आहे, सगळ्यांनी एकत्र यायला हवं. मविआ युपीएचाच एक भाग आहे. ममता यांच्या लढ्याचा आम्ही आदर करतो. पवार साहेबांनी सांगितलाय की, भाजपला रोखलं पाहीजे. सरकारचं चांगलं चालतंय. ममता यांना पुन्हा भेटू, त्यांनाही समजावून सांगू.

सोनियांच्या लीडरशीपवर कुणी आक्षेप घेतला नाहीये. बातचित करून यावर तोडगा काढू. ममतांनी जे म्हणटलंय ते योग्य आहे. आत्ता सुरवात झालीये, ऊद्धवजींशी चर्चा करू. विचार ठेवला होता की कांग्रेससोबतच पुढे जायचं, कांग्रेसला सोडलं तर मतांचं विभाजन होईल. ना युपीए, ना एनडीए कशाचाच भाग शिवसेना नाहीये असंही राऊत म्हणालेत.

भाजप विरोधातील लढाईत ममता बॅनर्जी ह्या महत्वपुर्ण योद्धा - संजय राऊत
मुंबईतील 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज' ही संस्था देशात सातव्या क्रमांकावर...

हिंदुत्वाबद्दल (Hindutva Politics) राऊत म्हणाले की, सावरकरांचे खरे वारसदार आम्हीच आहोत. त्यांचा विचार बाळासाहेबांनीच पुढे नेला. हिंदूत्वाबद्दल आम्ही कधीही यु टर्न घेतला नाही, तुम्ही सांगा की तुम्ही सावरकरांना का भारत रत्न देत नाही? प्रभू श्रीरामांचा ज्यांनी अपमान केला, रामविलास पासवान यांना घेऊन बसली ना भाजप सत्तेत… कुणाचेया मनात काय हे महत्वाचे असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com