पत्नीच्या अश्लील व्हिडिओच्या साहाय्याने पतीकडे लाखोंची खंडणी मागणाऱ्याला बिहारमधून अटक

पत्नीच्या अश्लील व्हिडिओ साहायाने पतीकडे लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी करणार्या बिहारमधील तरुणाविरोधात आरे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीच्या अश्लील व्हिडिओच्या साहाय्याने पतीकडे लाखोंची खंडणी मागणाऱ्याला बिहारमधून अटक
पत्नीच्या अश्लील व्हिडिओच्या साहाय्याने पतीकडे लाखोंची खंडणी मागणाऱ्याला बिहारमधून अटकसुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई: पत्नीच्या अश्लील व्हिडिओ साहायाने पतीकडे लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी करणार्या बिहारमधील तरुणाविरोधात आरे पोलिस ठाण्यात Aare Police Station Mumbai गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

तक्रारदाराची ४० वर्षीय पत्नी व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देत असे. त्यावेळेस आरोपी त्यांच्याकडे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण घेत होता. यावेळी आरोपीने महिलेच्या न कळत तिचा अश्लील व्हिडिओ काढला होता. हा व्हिडिओ त्याने महिलेच्या पतीला पाठून त्याच्याकडे खंडणी मगितली होती. पैसे न दिल्यास अन्यथा तो व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड करून महिलेची बदनामी करण्याची धमकी देत होता. या बदल्यात त्याने महिलच्या पतीकडे आठ लाख रुपयांची खंडणी मागितली होता.

पत्नीच्या अश्लील व्हिडिओच्या साहाय्याने पतीकडे लाखोंची खंडणी मागणाऱ्याला बिहारमधून अटक
सोलापुरात घरगुती गॅसचा काळाबाजार; आठ जणांना अटक!

त्यानंतर पीडितेच्या पतीने आरोपी विरोधात आरे पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल केला. हा आरोपी बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहे. तक्रारदाराला व्हॉट्स अॅपवर एक संदेश आला. त्यातील व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलीस तपास करीत आहेत.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com