अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी मुंबईमध्ये एका युट्यूब डायरेक्टटरला अटक!

आरोपीकडून पोलिसांनी तब्बल १ किलो चरस जप्त केलं आहे.
अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी मुंबईमध्ये एका युट्यूब डायरेक्टटरला अटक!
अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी मुंबईमध्ये एका युट्यूब डायरेक्टटरला अटक!सुरज सावंत

मुंबई : ड्रग्ज Drugs तस्करी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या Mumbai Police अंमली पदार्थ विरोधी पथकाने यू ट्यूब डायरेक्टटरलाYouTube Director अटक केली आहे. गौतम दत्ता असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १ किलो चरस जप्त केलं आहे.Man arrested in Mumbai for drug trafficking

हे देखील पहा-

मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकरण वाढत असून अनेक हायप्रोफाइल लोकांचा यामध्ये समावेश असल्याचे दिसून आले आहे या आधीही अंमली पदार्थ विरोधी पथकाने अनेक गुन्हेगारांना अंमली पदार्कथ तस्करी प्रकरणांमध्ये अटक केली आहे. अटक केलेला आरोपी हा एक युट्यूब डायरेक्टटर आहे त्याला जुहू वर्सोवा लिंक रोड परिसरात तो फिरत असताना. पोलिसांना त्याच्या संशयीत हालचालीवरुन त्याच्या वरती संशय आला आणि पोलिसांनी त्याची अंग झडती घेतली, त्यावेळी आरोपी गौतम दत्ताकडे १ किलो चरस सापडले आहे. बाजारात या चरसची किंमत जवळपास ५० लाख रुपये आहे.

अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी मुंबईमध्ये एका युट्यूब डायरेक्टटरला अटक!
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वादाला नव्याने फोडणी !

दरम्यान हे चरस गौतम बाँलीवूडच्या संबधित व्यक्तींना विकत असल्याचे समोर आले असूनपोलिस अधिक तपास करत आहे. आता या प्रकणामध्ये आणखी कोणाकोणाचा चेहरा समोर येणार हे पाहण महत्वाच आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com