पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या
पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्याSaam tv

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

पुण्यामध्ये (Pune) पुन्हा एकदा सासरच्या जाचाला कंटाळून एका जावयाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुणे: पुण्यामध्ये (Pune) पुन्हा एकदा सासरच्या जाचाला कंटाळून एका जावयाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नी, सासू, सासरे आणि मेहुण्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून धनकवडी परिसरात राहणाऱ्या एक व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी पुण्यातील गोखले नगर भागात ही एका व्यक्तीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती.

धनकवडी येथील तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली, त्यात पत्नी, सासू सासरा आणि मेहुण्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. शरद नरेंद्र भोसले (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या
कन्नड-चाळीसगाव घाटातील बोगद्याचा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच!

याप्रकरणी पत्नी, प्रियंका सासू नंदा, सासरा शंकर शिंदे आणि मेहुणा मनीष उर्फ गणेश शंकर शिंदे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र भोसले (वय 58, रा. धनकवडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सासू सासरे बायकोला नांदू देत नाहीत, तिला भडकवतात. म्हणून मी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख चिट्ठीत केलेला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com