तब्बल 4 हजार युद्धकालीन शिरस्त्राण, टोप्या, पगड्यांचा संग्रह करणारा कल्याणमधील अवलिया!

वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या, पगड्या, युद्धकालीन शिरस्त्राण, इतिहास कालीन अडक्कीते, पानाचे डब्बे, जुने कॅमेरे, कॅप बॅच जमा करण्यासह जोशी यांनी त्याचा खूप अभ्यासही केला आहे.
तब्बल 4 हजार युद्धकालीन शिरस्त्राण, टोप्या, पगड्यांचा संग्रह करणारा कल्याणमधील अवलिया!
तब्बल 4 हजार युद्धकालीन शिरस्त्राण, टोप्या, पगड्यांचा संग्रह करणारा कल्याणमधील अवलिया!SaamTvNews

कल्याण  :  मूळचे कल्याणचे रहिवासी असलेले अनंत जोशी यांनी इतिहासाचा ठेवा जपला आहे. तब्बल 4 हजार युद्धकालीन शिरस्त्राण, टोप्या, पगड्यांचा संग्रह त्यानी केला आहे. हा संग्रह कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombivli) मधील शाळेतील मुले हे सर्व पाहण्यासाठी येत असतात असे जोशी यांनी सांगितले. अनंत जोशी सांगतात की 8 वर्षांचे असताना आपल्याला एक वेगळ्या प्रकारची काविळ झाली. ज्यामुळे आपण बिछान्यावर झोपूनच होतो. त्यावेळी टिव्ही हाच एकमेव आपल्याला आधार घेऊन. टिव्हीवर त्याकाळी येणाऱ्या रामायण (Ramayana) आणि महाभारत (Mahabharata) या मालिका पाहूनच आपल्याला हा छंद जडला आणि हळूहळू आपण टोपी, पगडी गोळा करण्यास सुरुवात केली आणि या छंदामुळेच आपण आजारपणावर मात करून पुन्हा उभे राहू शकलो असे जोशी म्हणाले.

हे देखील पहा :

तर, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक तरी छंद जोपासला पाहीजे. आपल्या कठीण काळात हाच छंद आपल्याला एक वेगळी ऊर्जा देतो, बळ देतो असे अनंत जोशी यांनी सांगितले. आपल्या या अनोख्या छंदाची दखल लिम्का बुकने (Limca Book) घेतली असून लिम्का बुकमध्ये गेल्या 20 वर्षांपासून तर इंडिया बुकमध्ये गेल्या 10 वर्षांपासून या आपल्या छंदाचा समावेश केला आहे. तर, संपूर्ण जगभरात मानाचे स्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या गिनीज बुकनेही आपल्या कामाची दखल घेतली असल्याचे अनंत जोशी म्हणाले.  अनंत जोशी हे गेल्या 30 वर्षांपासून हा आपला अनोखा छंद जोपासत असून शिरोभूषण नावाच्या संग्रहालयात हा ठेवा जोपासला आहे.

तब्बल 4 हजार युद्धकालीन शिरस्त्राण, टोप्या, पगड्यांचा संग्रह करणारा कल्याणमधील अवलिया!
नंदुरबार : भाजपाच्या 42 व्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

भारताचा विचार केल्यास इकडे सत्ता गाजवलेल्या मराठा, राजपूत, मुघल काळातील युद्धकालीन शिरस्त्राण, जिरेटोप आदींचां खजिना आहे. तर जगभरातील ब्रिटन, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, चीन, रशिया आदी देशांतील विविध टोप्या, पगड्या, युद्धकालीन जिरेटोप, शिरस्त्राण संग्रही आहेत. यातील सर्वात जुने म्हणजे 18 व्या शतकात अफाणिस्तानमध्ये धातूंपासून बनवलेले शिरस्त्राणही आपल्या संग्रही असल्याचे जोशी यांनी सांगितले.तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या, पगड्या, युद्धकालीन शिरस्त्राण, इतिहास कालीन अडक्कीते, पानाचे डब्बे, जुने कॅमेरे, कॅप बॅच जमा करण्यासह जोशी यांनी त्याचा खूप अभ्यासही केला आहे. डिपार्टमेंट ऑफ आर्कीओलॉजी त्यांच्या संशोधनाच्या पेपरचे वाचनही केले.

तब्बल 4 हजार युद्धकालीन शिरस्त्राण, टोप्या, पगड्यांचा संग्रह करणारा कल्याणमधील अवलिया!
PMPML : पास बंद करण्याच्या निर्णयाचा प्रवाशांना नाहक त्रास

अनंत जोशी यांनी आपल्या आजरावर मात करत इतिहासाचा ठेवा जपला आहे. त्यातील साहित्य खालीलप्रमाणे :

३००० पेक्षा अधिक टोपी, पगडी, शिरस्त्राण, जिरेटोप

२००० पेक्षा अधिक इतिहासकालीन अडकिते आणि पानांचे डब्बे

सुमारे १२५ जुने कॅमेरे

१५०० पेक्षा अधिक कॅप वरील बॅचेस आणि इतर साहित्य

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com