डोंबिवलीतील खळबळ! दारूच्या नशेत मित्रानेच केली मित्राची हत्या

डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे ग्राउंडवर सोमवारी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने शहरात काल एकच खळबळ उडाली होती.
डोंबिवलीतील खळबळ! दारूच्या नशेत मित्रानेच केली मित्राची हत्या
Dombivli Crime News Saam Tv

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे ग्राउंडवर सोमवारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने शहरात काल एकच खळबळ उडाली होती. सदर घटनास्थळी पोलीस दाखल होत हत्येचा संशय येताच अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला होता. मृत व्यक्ती हा बिगारी असल्याने त्याच्याकडे मोबाईल नव्हता, ना कोणते ओळखपत्र होते. त्यामुळे आरोपी शोधण्यासाठी पोलिसांकडे कोणताही पुरावा नव्हता. त्यानंतर तांत्रिक पद्धतीच्या आधारे पोलिसांनी (Police) १२ तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Dombivli Crime News In Marathi)

Dombivli Crime News
माजी आमदार विवेक पाटील यांना ‘ईडी’चा पुन्हा दणका; मालमत्ता विक्रीवर घातली बंदी

पोलिसांना तपासादरम्यान त्यांना दोन टोप्या सापडल्या.या टोप्या कोणाच्या आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही चेक केले. तसेच काही तांत्रिक पद्धतीने एका व्यक्तीला शोधले,त्या व्यक्तीने साक्षीदार बनत पोलिसांना घडलेली माहिती सांगितली.पोलिसांनी लगेच इतर सीसीटीव्ही आधार घेत अखेर आरोपीला भागशाळा मैदान येथून पकडले.सदर आरोपीचे नाव अर्जुन मोरे(वय ३९) असून तो बिगारी म्हणून काम करतो.

Dombivli Crime News
बेल्हे-जेजुरी महामार्गावर मेंढ्यांच्या कळपाला भरधाव टेम्पोने चिरडले

त्या दिवसी नेमक काय घडलं होतं ?

मृत व्यक्ती , आरोपी अर्जुन मोरे आणि साक्षीदार हे रेल्वेच्या मैदानात दारू प्यायला बसायचे.त्यातून त्याची एकमेकांशी ओळख झाली. रविवारी रात्री सुद्धा हे मैदानात दारू प्यायला बसले होते.फुकटचे जेवण मिळाल्याने यांनी अजून दारू प्यायली आणि मृत व्यक्ती आरोपी अर्जुन यांच्यात दारूच्या नशेत बाचाबाची झाली.याच वेळी अर्जुन याने त्या व्यक्तीला लाकडी फळी डोक्यात मारली आणि तो जागीच मृत्यू(Death) झाला.

दरम्यान, याबाबत डोंबिवली (Dombivli) एसीपी सुनील कुराडे यांनी सांगितले की,दारूच्या नशेत वादावादी झाल्याने हत्या केल्याची आरोपीने मान्य केले आहे. आरोपीला ताब्यात घेतले असून आता कोर्टात हजर केले जाईल. तर मृत व्यक्तीचे नाव अद्याप समजले नसून आम्ही त्याचा शोध घेत आहोत,असे कुराडे यांनी सांगितले

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com