वसईत महिलेची छेड काढणाऱ्या इसमाला स्थानिकांनी चोपला

वसईत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
वसईत महिलेची छेड काढणाऱ्या इसमाला स्थानिकांनी चोपला
वसईत महिलेची छेड काढणाऱ्या इसमाला स्थानिकांनी चोपलाचेतन इंगळे

पालघर - वसई मधिल सनसिटी परिसरात सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉक साठी आलेल्या महिलांसोबत एक व्यक्तीने अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका सतर्क महिलेने छेडछाड करणाऱ्या व्यक्तीचा अर्धा किलोमीटर पाठलाग करत त्याला चांगलाच चोप दिला आहे. सदर छेडछाड करणाऱ्या व्यक्तिला जमावाने माणिकपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वसईत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा -

आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास संबंधित महिला मॉर्निंग वॉक करत होती. त्यावेळी शेष पाल नावाच्या तरुणाने या महिलेचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. दरम्यान आज सकाळी घडलेल्या या घटनेमुळे पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या महिलांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com