विवाहित महिलेचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, तरुणाला बेदम चोप

विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलीच मारहाण केली
विवाहित महिलेचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, तरुणाला बेदम चोप
विवाहित महिलेचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, तरुणाला बेदम चोपSaam Tv

वसई : विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलीच मारहाण केली आहे. त्याने तिचे अश्लील व्हिडिओ बनवले होते. त्यावरून तो तिला नेहमी ब्लॅकमेल करत असत. मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना शुक्रवार, 8 ऑक्टोबर दिवशी दुपारच्या सुमारास मुंबईजवळ वसई- नायगाव रेल्वे स्थानकात घडली आहे. मनोज थोरात असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मुंबईतील चुनाभट्टीचा रहिवासी आहे.

हे देखील पहा-

मागील काही महिन्यांपासून हा तरुण विवाहित महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवत होता. नेहमी तिला त्रास देत होता. तिला ब्लॅकमेल करत होता. शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. पीडित महिला मुंबईहून वसई नायगाव या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहण्याकरिता आली होती. परंतु नायगाव या ठिकाणी आल्यानंतर देखील तिला त्रास देणे सुरूच होते.

विवाहित महिलेचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, तरुणाला बेदम चोप
Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

अखेर महिलेने मनसे पदाधिकारी प्रफुल्ल कदम यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मनसे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना माहिती दिल्यानंतर वसई विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर, माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील, प्रफुल्ल कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तरुणांसाठी सापळा रचला होता. त्याला नायगाव रेल्वे स्टेशनवर पकडण्यात आले आहे. आणि मारहाण करण्यात आली आहे. त्याला मारहाण करून वाळीव पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.