मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात आल्या पण...

एकनाथ खडसेंना मात्र याप्रकरणी कोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे.
मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात आल्या पण...
मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात आल्या पण...सुरज सावंत

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे आज पुणे जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या पण ED कार्यालय बंद असल्याने मंदाकिनी खडसे या वाट पाहून निघून गेल्या असून थोड्या वेळाने त्या पून्हा येणार आहेत. मागील चार ते पाच वेळा समन्स देऊन देखील मंदाकिनी खडसे या हजर राहिल्या नव्हत्या. न्यायालयात अटक न करण्यासाठी मंदाकिनी यांनी धाव घेतली असता तपास यंत्रणानाने सहकार्य करण्याच्या अटीवर मंदकिनी यांना दिलासा दिला होता.

हे देखील पहा -

पुणे भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंदाकिनी खडसेंना चौकशीसाठी ईडीने समन्स बजावूनही खटल्याला वारंवार गैरहजर राहिल्याने मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टाकडून मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. दुसरीकडे, एकनाथ खडसेंना मात्र याप्रकरणी कोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे. एकनाथ खडसे हे सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. दरम्यान, यापूर्वी एकनाथ खडसे यांना ही बोलवण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे कारण देत त्यांनी वेळ मागून घेतली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com