
गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशभक्तांकडून मूर्ती घ्यायची लगभग सुरू झाली आहे. याचदरम्यान, महापालिकेने गणेशमूर्तींवर शिक्क विविध प्रकारचे शिक्के आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाला मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा विरोध दर्शवला आहे. (Latest Marathi News)
महापालिकेने कोणता निर्णय घेतला?
गणेशोत्सवात पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा याकरीता मुंबई महापालिकेने गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, हा आदेश अमान्य करत पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहिलं आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आयुक्त इकबाल सिंह चहल यांना 'गणेसोत्सव लाखो हिंदूंचा आस्थेचा विषय आहे. त्यामुळे या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा असं पत्राद्वारे कळवले आहे.
मंगल प्रभात लोढा यांनी पत्रात म्हटलं आहे की, 'गणेशोत्सव अतिशय आस्थेचा विषय आहे. मुंबईत या उत्सवाचे विशेष महत्व आहे. गणेशोत्सवात भगवान मूर्तीला पवित्र मानलं जातं. त्या काळात गणेशमूर्तीची मनोभावे पूजा केली जाते. या उत्सवात कोणाच्याही श्रद्धेला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर मूर्तींवर शिक्का मारणे किंवा रंग देणे योग्य नाही'.
'पालिकेच्या आदेशामुळे लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा. आदेशानुसार मूर्तीवर कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी किंवा शिक्केबाजी नको, त्याऐवजी दुसरा पर्याय शोधवा, असं मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे कळवले आहे. असं मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.