जबरीने मोबाईल चोरून नेणाऱ्या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी केली अटक...

कल्याण-डोंबिवली आणि परीसरात जबरीने मोबाईल चोरून नेणाऱ्या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही साह्याने आणि गुप्त बातमीदारामार्फत अटक केली.
जबरीने मोबाईल चोरून नेणाऱ्या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी केली अटक...
जबरीने मोबाईल चोरून नेणाऱ्या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी केली अटक...प्रदीप भणगे

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली आणि परीसरात जबरीने मोबाईल चोरून नेणाऱ्या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही साह्याने आणि गुप्त बातमीदारामार्फत अटक केली. सदर चोऱ्याकडून ३१ स्मार्टफोन्स व गुन्हयात वापरलेली एक ऑटो रिक्षा जप्त केली आहे. (Manpada police arrested a thief who forcibly stole a mobile phone)

हे देखील पहा -

फिर्यादी रामकुमार मुन्सी सिंह 22 ऑगस्ट रोजी सकाळी पिंपळेश्वर मंदीराच्या पाठीमागील गेट समोरील रोडवर पायी चालत असतांना पाठीमागुन आलेल्या एका अनोळखी दुचाकीस्वाराने त्यांच्याकडील मोबाईल जबरीने खेचुन पळुन गेला. याबाबत राजकुमार यांनी मानपाडा पोलिस स्थानकात तक्रार केली. मानपाडा पोलिसांनी लगेच तक्रार दाखल करत तपास चालू केला आणि गुप्त बातमीदारामार्फत सदरची जबरी चोरी करणारा सराईत चोरटा सुफीयान उर्फ सद्दो मलीक बागवान (25) याला भिवंडीतुन अटक केली. सदर चोरटा नवी मुबंईत राहणारा असून त्याच्याकडून सुमारे ३ लाख ४० हजार रूपये किंमतीचे एकुण ३१ स्मार्ट मोबाईल फोन व गुन्हयात वापरलेली एक ऑटो रिक्षा एम.एच.०४ एफ.सी. ६३८८ ही जप्त करण्यात आली.

जबरीने मोबाईल चोरून नेणाऱ्या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी केली अटक...
Aryan Khan Case: भाजपच्या हायप्रोफाईल नेत्याचा मेहुणाही ड्रग्स पार्टीत - नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

सदर चोरट्यावर डोंबिवली, कोळसेवाडी, मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाइल चोरी झाल्याचे तक्रारी दाखल होत होत्या. त्या अनुषंगाने डोंबिवलीचे एसीपी जय मोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे, पोलीस हवालदार राजेंद्र खिल्लारे यांच्या पथकाने आरोपी सुफियांन बागवान याला अटक केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com