दोन सराईत दुचाकी चोरांच्या मानपाडा पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

या चोरांकडून तब्बल एकूण १७ दुचाक्या केल्या हस्तगत केल्या आहेत.
दोन सराईत दुचाकी चोरांच्या मानपाडा पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
दोन सराईत दुचाकी चोरांच्या मानपाडा पोलिसांनी आवळल्या मुसक्या!SaamTvNews

डोंबिवली : दोन सराईत बाईक चोरट्यांच्या मानपाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल एकूण १७ दुचाक्या केल्या हस्तगत केल्या आहेत. डोंबिवली (Dombivli) जवळील खोणी येथील पलावा येथील राहणार युसूफ शकील अहमद खान हा फॅशन डिझायनरचे काम करायचा. मात्र, लॉकडाऊनमध्ये (Lockdown) व्यवसाय बंद झाल्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोटार सायकल चोरी करत असत.

हे देखील पहा :

मोटरसायकलींचे खोटी व बनावट कागदपत्रे तयार करुन त्यावर मुळ मालकांच्या बनावट स्वाक्षरी करुन आणि आरटीओची (RTO) फसवणूक करून सदरची कागदपत्रे व मोटारसायकलचे फोटो ओएलएक्सवर टाकुन सदर विक्री करत होता. मात्र, मोटारसायकलच्या (Bike) मूळ मालकाला ट्रॅफिक नियम मोडल्याप्रकरणी चलान गेल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि मानपाडा पोलिसांनी सापळा रचत युसूफला अटक केली आहे.

दोन सराईत दुचाकी चोरांच्या मानपाडा पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
जालन्यात वाळू माफियांकडून महसूल विभागाच्या पथकावर हल्ला!

तर, दुसरीकडे कल्याण-डोंबिवली आणि परिसरात मोटार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विविध पोलीस (Police) पथके स्थापन करण्यात आली होती. सदर पथकांनी ज्या भागातुन मोटार वाहने चोरी झालेली आहेत त्या भागात असलेल्या गस्त घालुन संशयीत इसमांवर पाळत ठेवली होती.

दोन सराईत दुचाकी चोरांच्या मानपाडा पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
रुग्णालयाच्या मनमानीमुळे राहुरीमध्ये भर रस्त्यातच महिलेची प्रसूती!

दरम्यान, मुंब्रा (Mumbra) येथे राहणारा शाहरुख शेख याच्यावर पोलिसांना संशय आला. त्याला मुंब्रा येथून ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने साथीदाराच्या मदतीने मानपाडा, नारपोली, चितळसर मानपाडा व डायघर तसेच इतर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटार सायकल चोरुन (Bike Theft) त्या मुंब्रा येथील सिया कब्रस्तानच्या बाहेर ठेवल्या असल्याचे सांगितले. त्याच्याकडून एकूण 5 लाख रुपये किंमतीच्या सुमारे 13 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com