आघाडीतील अनेक आमदार नाराज, विजय आमचाच; राम शिंदेंचा दावा

'उद्याच्या निवडणुकीत विजय आमचाच होईल, महाविकास आघाडीत अनेक आमदार नाराज'
आघाडीतील अनेक आमदार नाराज, विजय आमचाच; राम शिंदेंचा दावा
Ram ShindeSaam TV

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी उद्या सोमवार दिनांक २० जून रोजी मतदान होणार असून या निवडणुकीसाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप (BJP) दोन्ही गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र, उद्याच्या निवडणुकीत विजय आमचाच होईल, महाविकास आघाडीत अनेक आमदार नाराज असून त्या नाराज आमदारांची मते देखील आम्हालाच मिळतील असा विश्वास भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांनी व्यक्त केला आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत, शिवाय निवडणुकीतील पाचव्या जागेवरील उमेदवार कसा निवडून आणायचा, यासाठी भाजप सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळी रणनिती आखायला सुरुवात केली असतानाच उद्याच्या निवडणुकीत विजय आमचाच होईल अस राम कदम म्हणाले.

हे देखील पाहा -

एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीत अनेक आमदार नाराज असून त्या आमदारांची मते देखील आपल्यालाच मिळतील असं वक्तव्य राम कदम यांनी केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट झाली का? असा प्रश्न विचारला असता, 'ते सांगायच नसतं.' असं म्हणत त्यांनी भेटीबाबतचा सस्पेन्स देखील ठेवला आहे. दरम्यान, विजय आमचाच होणारं आहे त्यामूळेच चेहऱ्यावर आनंद असल्याचंही ते पत्रकारांना म्हणाले.

शिवाय महत्वाची बाब म्हणजे, राम शिंदे यांचा मुक्काम हॉटेल ट्रायडण्टमध्ये (Hotel Trident) आहे. मात्र, भाजपचे इतर आमदार ताजमध्ये मुक्कामाला असताना शिंदेंचा मुक्काम मात्र ट्रायडण्टला असल्यामुळे देखील राजकीय चर्चा रंगल्या आहेत. कारण, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मुक्काम देखील ट्रायडण्ट हॉटेलमध्ये आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com