मुंबईतल्या चक्क ८४ विहिरी गायब ? कुठेच नोंद कशी नाही....

मुंबईतल्या Mumbai कुर्ला Kurla परिसरात खऱ्या खुऱ्या एक दोन नव्हे तर तब्बल ८४ विहिरी हरवल्याचं समोर आलंय
मुंबईतल्या चक्क ८४ विहिरी गायब ? कुठेच नोंद कशी नाही....
मुंबईतल्या चक्क ८४ विहिरी गायब- Saam Tv

मुंबई : "जाऊ तिथे खाऊ" या नावाचा मकरंद अनसपुरेंचा Makrand Anaspure मराठी चित्रपट तुम्ही पाहिला असेलच . पण या चित्रपटातली विहीर Well न बांधतात चोरील गेली होती . पण मुंबईतल्या Mumbai कुर्ला Kurla परिसरात खऱ्या खुऱ्या एक दोन नव्हे तर तब्बल ८४ विहिरी हरवल्याचं समोर आलंय. Many Wells Missing in Mumbai

यातील खासगी मालकीच्या ४३ विहिरी आणि सरकारच्या Government ३८ आणि पालिकेच्या तीन विहिरींचा समावेश आहे. आणि याहून महत्वाची बाब म्हणजे या विहिरी हरवल्या असल्या तरी याची नोंद सरकारी दफ्तरात नसल्याचं समोर आलंय. आणि याहून महत्वाची बाब म्हणजे सरकार दरबारी या विहिरी नेमक्या कश्या हरवल्याची माहितीच उपलब्ध नाही .

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई सारखी शहरं वाढत होती आणि या वाढत्या शहिरीकरणादरम्यान पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विहिरी बांधण्यात आल्या होत्या . खासगी काही शासकीय विहिरी निर्माण केल्या गेल्या होत्या. पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी या विहिरींमधल्या पाण्याचा वापर होऊ लागला होता. पण पालिकेने मुंबईत पाण्याच्या पुरवठ्यासाठी तयार केलेल्या यंत्रणेमुळे या विहिरींकडे सगळ्याचच दुर्लक्ष झालंय. झपाट्याने विकास होत असताना यातील अनेक विहिरी बुजवल्या असल्याची शक्यता आहे. Many Wells Missing in Mumbai

मुंबईतल्या चक्क ८४ विहिरी गायब
चित्रा वाघ यांच्या टीकेवरती, रुपाली चाकणकरांचे उत्तर (पहा व्हिडीओ)

माहिती अधिकार कार्यकर्ते सागर उगले यांनी पालिकेकडे मागवल्या माहितीच्या आधिकाराखाली कीटक नियंत्रण विभागाकडू उपलब्ध झालेल्या माहितीत ही बाब समोर आलीये. ८४ विहिरी यातील पालिकेच्या ३ , खासगी ४३ , सरकारी ३८ आणि ७ विंधन विहिरींचा समावेश आहे . या विहिरी गायब वा बुजवण्यात आल्या असल्याचं सांगण्यात आलंय. तसेच या परिसरातील किती विहिरी पुनरुज्जीवित केल्या संदर्भातल्या माहितीवर मात्र 'त्या संदर्भातली नोंद पालिका दरबारी उपलब्ध नसल्याचं' उत्तर देण्यात आलं आहे . Many Wells Missing in Mumbai

२००९ मध्ये विहिरीच्या संवर्धनाची घोषणा करण्यात आली होती. पण पुढे या घोषणेचा पालिकेला विसर पडल्याचं आता चित्र आहे. त्याच बरोबर २००९ साली मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विहिरींचे संवर्धन करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाचा सत्ताधारी शिवसेनेलाही विसर पडल्याचं या प्रकारावरून स्पष्ट झालं आहे. मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वचननाम्यात शिवसेनेने विहिरींचे संवर्धन करण्याचे आश्वासन दिले होतं. पण त्यावर पुढे ठोस कोणतीच भूमिका घेण्यात आली नसल्याचं यामुळे समोर आलंय.

Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.